Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते

‘कसोटी जिंदगी की’, ‘कुसुम’, ‘नागिन २’ अशा प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेता करणवीर बोहराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करणवीर शनिवारी (२८ ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आता आपल्या ३९व्या वयात पदार्पण केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने लाखो चाहत्यांना खुश केले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याच्यावर दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वाढदिवसानिमित्त त्याचा आतापर्यांतच जीवनप्रवास जाणून घेऊ.

करणवीर बोहराचा जन्म २८ ऑगस्ट, १९८२ मध्ये जोधपूर येथील मारवाडी कुटुंबात झाला. या अभिनेत्याला घरामधूनच अभिनयाची परंपरा मिळाली. त्याचे वडील महेंद्र बोहरा एक चित्रपट निर्माते होते. तसेच आजोबा देखील एक अभिनेते आणि निर्माते होते. त्याला शिक्षणाची तशी फारशी गोडी नव्हती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण तो १२वी मध्ये नापास झाला होता. जी. डी सोमानी मेमोरियल स्कूल, कफ परेड येथून त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेतून १२वी दिली. परंतु तो तेथे नापास झाला. त्यानंतर त्याने चर्चगेटच्या सिडेनहॅम महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १२वी उत्तीर्ण झाला. (Actor karanvir Bohra birthday he is produces films and runs his own clothing brand)

त्याच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले, तर त्याने बालपणापासूनच आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. साल १९९० मध्ये ‘तेजा’ या चित्रपटामध्ये त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांनतर साल १९९९ मध्ये आलेली मालिका ‘जस्ट मोहब्बते’ मध्ये त्याने आपली भूमिका साकारली. तसेच त्याने ‘अचानक ३७ साल बाद’ आणि ‘सीआयडी’मध्ये सहाय्यक दिगदर्शक म्हणून काम केले. साल २००१ मध्ये आलेली ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून त्याला चांगलीच पसंती मिळाली.

करणवीर बोहराने ‘नच बलिए ४’, ‘झलक दिखला जा ६’, ‘फीयर फॅक्टर: खतरों के खिलाडी ५’ आणि ‘बिग बॉस १२’ अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर त्याने ‘किस्मत कनेक्शन’, ‘लव यू सोनिए’, ‘मुंबई १२५ केएम’, ‘पटेल की पंजाबी शादी’ आणि ‘हमें तुमसे प्यार कितना’ अशा बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

करणवीर पंडित वीरू कृष्णनन यांच्याकडून २ वर्षे कथक देखील शिकला. तसेच झी ५ वर प्रदर्शित होणारी वेबसीरिज ‘द कसिनो’ आणि ‘भंवर’ यामध्ये देखील त्याने काम केले आहे. आपल्या अभिनयाने त्याने हिंदी भाषिक मालिकांमध्ये जास्त पसंती मिळवली. साल २००६ मध्ये त्याने मॉडेल-वीजे तीजय सिद्धू बरोबर लग्न केले. त्याचा स्वतःचा कपड्यांचा एक ब्रँड देखील आहे. ‘पेगासस’ या कपड्यांच्या ब्रँडचा तो मालक आहे.

त्याने आतापर्यंत कमावलेले चाहते आज त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

निर्मात्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप; तर पत्रिका वाटप होऊनही ‘या’ कारणामुळे मोडले होते शिल्पाचे लग्न

हे देखील वाचा