Tuesday, July 9, 2024

करीना कपूरने लाडक्या तैमूरसोबतचा फोटो केला शेअर; म्हणाली, ‘हार्ट ब्रेकर’

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आजकाल तिच्या दोन मुलांसोबत खूप एन्जॉय करताना दिसत आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे आणि दररोज मुलांसोबत फोटो शेअर करत असते. करीनाचा मोठा मुलगा तैमूर अली खान हा एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. त्याचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. तो अनेकदा मस्ती करतानाही दिसतो. नुकतेच करीनाने तैमूरसोबत एन्जॉय करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

करीनाने तैमूरसोबतचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. फोटोमध्ये करीनाने पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्यावर ‘हार्ट ब्रेकर’ लिहिले आहे. फोटो शेअर करत करीनाने लिहिले की, “टीम माझ्या टी-शर्टवर काय आहे? तू.” यासोबतच तिने हार्ट ईमोजीचाही समावेश केला आहे.

करीना वडील रणधीर कपूरांच्या गेली घरी
हा फोटो पोस्ट केल्यानंतर करीना कपूर तिची दोन मुले तैमूर आणि जेह यांच्यासह तिचे वडील रणधीर कपूर यांच्या घरी गेली. जिथे पूर्ण कपूर कुटुंब जमले होते. कदाचित संपूर्ण कपूर कुटुंब ऋषी कपूर यांच्या जयंतीसाठी जमले असेल. करिश्मा कपूर, आदर जैन, अरमान जैन यांच्यासह अनेक लोक रणधीर कपूर यांच्या घरी पोहोचले आहेत.

करीना कपूर झाली होती ट्रोल
अलीकडेच करीना कपूर तिच्या दोन्ही मुलांसोबत स्पॉट झाली. ज्यामध्ये तिने जेहला आपल्या मांडीवर उचलले होते. करीनाचा एक फोटो समोर आला होता. ज्यात तिने समोरून जेहला पकडले होते. हा फोटो पाहून ट्रोलर्स तिला ट्रोल करत होते. ते म्हणाले होते की, “करीनाला मुलाला कसे घ्यावे हे देखील माहित नाही. तो खूप अस्वस्थ दिसत आहे.” यासह, करीना जेहच्या कपड्यांबद्दल ट्रोल झाली होती. नेटकऱ्यांनी म्हटले होते की, “तिने मुलाला सैल कपडे घालावेत.”

फॅमिली ट्रिपला गेली होती
सैफ अली खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, करीना तिच्या दोन मुलांसह आणि पतीसह सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीवला गेली. जिथून तिने अनेक फोटो शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. जेह ६ महिन्यांचा असताना तिने मालदीवमधील पोस्ट देखील शेअर केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

हे देखील वाचा