अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. याचे सगळ्यात माेठे कारण म्हणजे त्यांची दाेन मुले तैमुर आणि जेह. करीना कायमच त्या दाेघांचे फाेटाे आणि व्हिडिओ साेशल मीडियावर शेअर करताना दिसते. करीनाच्या म्हणण्यानुसार, तिची दाेनही मुले फार खाेडकर आहेत. तरीदेखील तैमुर त्याच्या वयापेक्षा जास्त समजदार आहे. त्याला कल्पना आहे की आई- बाबा दोघेही व्यावसायिक कलाकार आहेत आणि ते संपूर्ण वेळ त्यांच्याबरोबर राहू शकत नाहीत.
माध्यमांशी बोलताना करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली की, “तिच्या दोन्ही मुलांनी हे समजून घ्यावे की, त्यांचे पालक चांगल्या लाईफस्टाईलसाठी काम करत आहेत आणि त्यांच्यासोबत कायम राहू शकत नाहीत.” करीना पुढे सांगते की, “तैमूर 7 महिन्यांचा असल्यापासून मी काम करत आहे. म्हणून मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की, कामानिमित्त कधी मला, तर कधी बाबांना बाहेरगावी जावे लागेल. तैमूर आणि जेह यांना हे समजावं लागेल की, चांगल्या लाईफस्टाईलसाठी त्याचे आई- बाबा काम करतात.”
तैमूरला बनायचंय वडील सैफसारखं
त्याबरोबर, करीनाला आपल्या मुलांवर असे संस्कार करायचे आहेत, जेणेकरून त्यांना समजेल की, एक स्त्री देखील काम करू शकते. दरम्यान करीनाने सांगितले की, तैमूर त्याचे वडील सैफच्या जास्त जवळ आहे. बाप-लेक अनेकदा सोबत सिनेमा बघतात. तैमूरला त्याचे वडील सैफसारखे बनायचे आहे. मात्र, हे सर्व पाहून करीनाला असे वाटते की, आपल्या विरोधात मूल एक टोळी तयार करत आहेत.
त्याचबरोबर करीनाला असेही वाटते की, तैमूर त्याच्या वयाच्या तुलनेत खूप समजदार आहे. त्याच्याकडे कलात्मक कौशल्य आहे. तो त्याच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचे सतत चित्र काढत असतो. करीनाची तैमूर आणि जेह ही दोन्ही मुलं सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध आहेत. तरीदेखील करीना आणि सैफ आपल्या व्यस्त वेळापत्रकांमधून आपल्या मुलांसोबत चांगला वेळ घालवतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
क्या बात है! ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ दाखवणारी आगळी वेगळी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
कियाराच्या ब्रालेस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, सर्वत्र रंगलीय चर्चा
मुख्य हिरोपेक्षाही भाव खाऊन गेलेत ‘हे’ सहाय्यक कलाकार, पाहा कोण आहेत दिग्गज?