Wednesday, July 17, 2024

करीना कपूर खान बनली पुणे पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीची फॅन! सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस सातत्याने लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मास्क घालण्याबाबत जागरूक करत असतात. अलीकडेच पुणे पोलिसांनी लोकांना मास्क घालण्यासाठी आणि कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. 

पुणे पोलिसांच्या अनोख्या पद्धतीवर अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने तिचे आजोबा आणि अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटावर आधारित पुणे पोलिसांच्या कोव्हिड-१९ मोहिमेचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे, “शानदार व्हिडिओ.” सोबतच तिने टाळ्या वाजवणारा आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. (kareena kapoor khan reacted on pune police covid 19 campaign based on raj kapoor film mera naam joker)

करीनाने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
करीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिच्या इंस्टाग्रामवर मीडिया आउटलेटचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक पोलिस ट्विस्टसह ‘ए भाई जरा देख के चलो’ गाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी लोकांना मास्क घालण्याची आणि किरकोळ सर्दी म्हणून चूक करू नका, हे पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ४१,३२७ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. राज्यात कोविड-१९च्या ओमिक्रॉन प्रकाराची ८ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या १,७३८ वर पोहोचली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा