बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन ही खूप सामान्य गोष्ट आहे. आजकाल, निर्मात्यांनी पडद्यावर रोमान्स दाखवण्याची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. बदलत्या काळानुसार चित्रपट जगानेही हा बदल स्वीकारला आहे. कदाचित हेच कारण आहे की, आजच्या काळात निर्मात्यांसह आता प्रेक्षक देखील मोठ्या पडद्यावर किस सीन पाहताना अस्वस्थ होत नाहीत. चित्रपटांमध्ये किस सीन अगदी सामान्य झाले आहेत. केवळ आजची नवीन पिढीच नाही, तर बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार आहेत ते देखील स्क्रीनवर लिप लॉक किंवा किस करताना दिसतात.
स्क्रिप्टच्या मागणीनुसार तोडावी लागली ‘नो किसिंग पॉलिसी’
जरी असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी सुरुवातीला ‘नो किसिंग पॉलिसी’ स्वीकारली आणि कोणताही चित्रपट करण्यापूर्वी त्यांनी स्पष्ट केले की, ते ऑनस्क्रीन किस करणार नाहीत, पण स्क्रिप्ट आणि चित्रपटाच्या मागणीमुळे त्यांना स्वतःला ही पॉलिसी तोडावी लागली. आज आम्ही तुम्हाला या लेखात त्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी ऑन स्क्रीन किसिंग पॉलिसी स्वीकारली, पण नंतर त्यांनी स्वतः ती पॉलिसी तोडली.
ऐश्वर्या राय बच्चन
बच्चन कुटुंबाची सून आणि बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने जेव्हा आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा तिने ऑनस्क्रीन कोणत्याही कलाकाराबरोबर लिप लॉक किस करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र, २००६ मध्ये जेव्हा ‘धूम २’ हा चित्रपट आला, त्यावेळी स्क्रिप्टची मागणी समजून ऐश्वर्या राय बच्चनने ऋतिक रोशनसोबत लिप-लॉक किस केले होती. याशिवाय ऐश्वर्याने रणबीरसोबत ‘ए दिल है मुश्किल’मध्येही किस केले आहे.
अजय देवगण
ऍक्शन असो किंवा कॉमेडी अजय देवगणने प्रत्येक भूमिका पडद्यावर उत्तमरीत्या साकारल्या आहेत. २५ वर्षांच्या कारकिर्दीत अजयने कधीही कोणत्याही अभिनेत्रीसोबत लिप-लॉक केले नव्हते. मात्र, त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘शिवाय’ चित्रपटात त्याने त्याची नो किसिंग पॉलिसी तोडली आणि त्याची सहकलाकार एरिकाला किस केले. याबद्दल बोलताना अजय असेही म्हणाला की, त्याने कधीही ऑनस्क्रीन किसिंग क्लॉज लिखित स्वरूपात ठेवले नाही. ‘शिवाय’मधील चित्रपटाच्या मागणीमुळे एरिकाला किस करावी लागली.
करीना कपूर खान
लग्नापूर्वी करीना कपूर खानने अनेक कलाकारांना ऑनस्क्रीन किस केले आहे, पण तिच्या लग्नानंतर तिने तिच्या क्लॉजमध्ये ‘नो किसिंग पॉलिसी’ जोडली. मात्र, २०१६ मध्ये करीना कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर चित्रपट ‘की अँड का’ स्क्रिप्टच्या मागणीनुसार तिला अर्जुन कपूरला ऑनस्क्रीन किस करावे लागली. या चित्रपटासाठी करीनाने तिची ऑनस्क्रीन ‘नो किसिंग पॉलिसी’ क्लॉज तोडला.
सैफ अली खान
करीना कपूर खानसोबत तिचा पती सैफ अली खाननेही लग्नानंतर ऑनस्क्रीन किसिंग पॉलिसी स्वीकारली होती. मात्र, त्यालाही चित्रपटाच्या मागणीनुसार स्वतःचा क्लॉज तोडावा लागला. वास्तविक, जेव्हा त्याचा रंगून चित्रपट आला, त्या काळात त्याला स्क्रिप्टच्या मागणीनुसार कंगना रणौतला ऑनस्क्रीन किस करावी लागली.
शाहरुख खान
आपल्या रोमांसच्या जोरावर बॉलिवूडमध्ये सत्ता गाजवणारा बादशाह शाहरुख खानने चित्रपट विश्वाला रोमान्सची एक नवी व्याख्या दिली. मात्र, त्यालाही काळाबरोबर चालावे लागले. शाहरुख खानने ‘जब तक है जान’ चित्रपटात कॅटरिना कैफसोबत लिप-लॉक किस केली. शाहरुखने याबद्दल सांगितले, ही त्याच्या स्क्रीनची मागणी होती. यश चोप्रा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यामुळे तो त्यांना नकार देऊ शकला नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शाहरुख खानने लाँच केले रितेश अन् जिनिलियाचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’, मजेशीर ट्वीट चर्चेत
-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी
-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?