Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कॅन्सरच्या वेदनेतून गेलीय कार्तिक आर्यनची आई, अभिनेत्याचे अश्रू अनावर; म्हणाला, ‘तो काळ विसरता येणार नाही’

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कार्तिक सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असतो. कार्तिक वेळोवेळी त्याच्या चाहत्यांना त्याच्या कुटुंबाशी जोडत असतो. अलीकडेच, त्याने त्याच्या आईबद्दल सांगितले की, त्या कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. कार्तिकची आई माला तिवारी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ४ वर्षे या गंभीर आजाराशी लढल्यानंतर त्यांनी ही लढाई जिंकली. कार्तिकने स्वतः याबद्दल सांगितले. ही गोष्ट त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आईबद्दल बोलताना भावूक झाला कार्तिक
“मी आणि माझ्या कुटुंबाने स्वतःला कसे हाताळले, हा काळ विसरता येणार नाही,”
असे त्याने सांगितले. व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या आईबद्दल सांगत होता तेव्हा त्याचे डोळे ओले झाले होते. खरं तर, कार्तिकने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तो हॉस्पिटलमध्ये कॅन्सरबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन म्हणतो की, “डॉक्टरांनी या प्रक्रियेत भाग घेतला, प्रत्येकजण ज्या पद्धतीने बोलतो, ते रुग्णांसोबत राहतात, त्यांना प्रोत्साहन देतात, त्यामुळे आमच्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता, मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे.” कार्तिकचे डोळे ओले झाले आणि घसा भरून आला. त्यानंतर तो काही सेकंदांसाठी बोलणे बंद करतो.

कार्तिकने लिहिले अतिशय भावूक कॅप्शन
”केमो थेरपीच्या सत्रापासून ते आज या मंचावर डान्स करण्यापर्यंत तिची सकारात्मकता आणि निर्भयपणा नेहमीच तिच्यासोबत आहे. आज मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की, माझ्या आईने कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली आहे, ती एक विजेती आहे. त्यांच्यामुळे आम्हा सर्वांना बळ वाटतं. आई, मला तुझा खूप अभिमान आहे, या युद्धात जे हरले किंवा जे हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो.”

कार्तिक आर्यनने २०११ मध्ये लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील कार्तिक आर्यनचे काम सर्वांनाच आवडले होते. या चित्रपटात तो एकटाच अभिनेता नसला तरी त्याने बोललेले लांबलचक एकपात्री प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यानंतर कार्तिकने ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका-छुपी’, ‘धमाका’ असे अनेक यशस्वी चित्रपट दिले. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘भूल भुलैया २’, ‘शहजादा’, ‘फ्रेडी’, ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा