Saturday, April 20, 2024

पुन्हा एकदा प्रेमात पडलाय कार्तिक आर्यन! अखेर सोशल मीडियावर शेअर केलाच फोटो

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा हिंदी चित्रपटक्षेत्रातील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांइतकीच त्याच्या खासगी आयुष्याचीही सोशल मीडियावर नेहमी चर्चा होताना दिसत असते. आपल्या दमदार अभिनयाने कार्तिकने सिनेसृष्टीत स्ताःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्यासंबंधीत अनेक बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता कार्तिकच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती समोर आली आहे. कोण आहे हा पाहुणा चला जाणून घेऊ.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या कार्तिक आर्यनने आपल्या देखण्या लूकमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसत असते. आताही सगळीकडे त्याच्या घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची चर्चा सुरु आहे. याचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कार्तिकही चांगलाच आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तुम्हालाही कार्तिकच्या घरी आलेल्या या पाहुण्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा झाली असेल ना? तर आता सांगुनच टाकतो.

कार्तिकच्या घरी आलेला हा पाहुणा म्हणजे एक गोंडस पांढऱ्या रंगाचं कुत्रं आहे. या कुत्र्याला हातात पकडून उभा असलेल्या कार्तिकचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. कार्तिकने या कुत्र्यालाचे नाव कटोरी आर्यन ठेवले आहे. त्याने हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकांउंटवरही पोस्ट केले आहेत. सोबतच त्याने “कटोरी मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलोय” असे भन्नाट कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनाही त्याचा हा फोटो खूपच आवडला आहे.

दरम्यान कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कार्तिकने एका वृत्त निवेदकाची भूमिका साकारली आहे. चाहत्यांनी या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधी कार्तिकच्या ‘पंचनामा’, ‘लव आजकल’, ‘लुका छुपी’ या चित्रपटाने जोरदार यश मिळवले होते. आता लवकरच तो ‘भूलभूलैया २’ या चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा