Monday, July 1, 2024

‘भूल भुलैय्या २’ने कमावले २०० कोटींहून अधिक रुपये, पण युरोपात गेलेल्या कार्तिकला ओळखण्यास चाहत्याचा नकार

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैय्या २’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या या सिनेमाने अफाट यश मिळवले. इतकेच काय तर बॉक्स ऑफिसवर सिनेमाने २०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. यानंतर त्याच्यावर सर्व बाजूंनी कौतुकाची थाप पडत आहे. अशात तो त्याच्या सिनेमाच्या टीमसोबत युरोप दौऱ्यावर फिरायला गेला आहे. इथे तो त्याच्या सिनेमाच्या यशाचा जल्लोष करत आहे. अशात तेथील त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याच्या एका चाहत्याला विश्वास होत नाहीये की, तो कार्तिक आर्यन आहे. यावर कार्तिकनेही मजेशीर प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे सर्वत्र एकच हशा पिकत आहे.

या व्हिडिओत कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) रस्त्यावरील जेवणाची मजा घेताना दिसत आहे. तेवढ्यात एक चाहता त्याच्याजवळ धावत येतो आणि म्हणतो की, “मी तुझ्यासोबत एक फोटो घेऊ शकतो का? माझ्या मित्राला विश्वास होत नाहीये की, तुम्ही कार्तिक आर्यनच आहात.”

कार्तिक आर्यनचे मजेशीर प्रत्युत्तर
त्या चाहत्याचे ऐकल्यानंतर कार्तिक लगेच उत्तर देतो की, “पण मी कार्तिक आर्यनच आहे. मी आधार कार्ड दाखवू.” त्याचे हे वाक्य ऐकून उपस्थित सर्व लोक हसू लागतात. कार्तिकच्या या व्हिडिओवर (Kartik Aaryan Video) चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ते कार्तिकच्या विनोदबुद्धीची प्रशंसा करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @insta_stars_official_

युरोपमधील फोटोही केले शेअर
कार्तिक सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतो. तो स्वत:शी निगडीत अपडेट्स त्याच्या चाहत्यांना देत असतो. सध्या तो युरोपमधील त्याचे फोटो शेअर करत आहे. कार्तिकने बाल्कनीमधील दृश्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “मजेदार तथ्य- बीटल्स या खोलीत राहिले. मला आशा आहे की, एखाद्या दिवशी कोणीतरी फोटो शेअर करेल की, कोकी इथेच राहिला होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

‘भूल भुलैय्या २’ या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर २०० कोटींच्या क्लबमध्ये हा सिनेमा सामील झाला आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत कियारा आडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बाजमी यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

खूपच आजारी, चालता-फिरताही येईना, आपल्या तब्येतीच्या खोट्या बातम्यांवर भारतीची आगपाखड; व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग! साऊथ इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतला शेवटचा श्वास

ढालेपाटलांच्या सूनांचा नाद खुळा! कमाल डान्स पाहून तुमचेही थिरकतील पाय

हे देखील वाचा