Saturday, April 18, 2026
Home टेलिव्हिजन खूपच आजारी, चालता-फिरताही येईना, आपल्या तब्येतीच्या खोट्या बातम्यांवर भारतीची आगपाखड; व्हिडिओ व्हायरल

खूपच आजारी, चालता-फिरताही येईना, आपल्या तब्येतीच्या खोट्या बातम्यांवर भारतीची आगपाखड; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर नेहमीच कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी हेच फोटो कलाकारांच्या चिंतेचा विषय ठरतात. यंदाही असेच काहीसे घडले आहे कॉमेडी क्वीन भारती सिंग हिच्यासोबत. भारतीला ऑनस्क्रीन पाहताच चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटते. भारती ही फक्त टीव्हीवरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही मजेशीर अंदाजासाठी ओळखली जाते. मात्र, आता भारतीला राग अनावर झाला आहे. भारती तिची तब्येत बिघडल्याच्या बातम्यांमुळे हैराण झाली आहे.

व्हिडिओ शेअर करत खोट्या बातम्या देणाऱ्यांना भारतीने झापले
झाले असे की, भारती सिंग (Bharti Singh) हिने तिच्या आजारपणाची बातमी पाहिल्यानंतर तिला राग अनावर झाला. त्यामध्ये लिहिले होते की, भारती सिंग गंभीररीत्या आजारी आहे. तिला चालता फिरताही येत नाही. यानंतर भारतीचा पारा चढला आणि तिने व्हिडिओ शेअर करत खोट्या बातम्या देणाऱ्यांना झापले.

‘मी बिल्कुल सुरक्षित आहे’
भारती सिंग हिने या व्हिडिओत आपल्या चाहत्यांना सांगितले की, ती बिल्कुल सुरक्षित आहे. तिने म्हटले की, “नमस्कार मित्रांनो, मी बिल्कुल सुरक्षित आहे. काही माध्यम संस्था माझी तब्येत खराब असल्याच्या बातम्या देत आहेत. मी बेडवर आहे आणि चालू-फिरू शकत नाही. मात्र, असे काहीच नाहीये. ज्यानेही ही बातमी दिली आहे, मला त्यांना सांगायचे आहे की, असे अनेक लोक आहेत, जे खूप चिंतेत आहेत. लोकांची घरं पाण्यात बुडली आहेत. कोरोना व्हायरस वाढत आहे. तुम्ही त्या बातम्याही दाखवा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जुने फोटो आणि खोट्या बातम्या
भारती सिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीने तिचे कोणते फोटो खोट्या बातमीत वापरले जात आहेत, हे देखील सांगितले आहे. ती म्हणाली, “ज्या व्हिडिओमध्ये मी झुल्यातून पडली होती तो एक मजेदार व्हिडिओ होता. हे दाखवून आणि गर्भधारणेचे चित्र दाखवून असे म्हणणे योग्य नाही. खोट्या बातम्या अजिबात दाखवू नका. मला माहित आहे की, असे बरेच लोक आहेत. जे माझ्यावर प्रेम करतात, पण तू असं करत नाहीस.”

खरं तर नुकताच भारतीने तिचा वाढदिवस साजरा केला. या क्षणी तिच्या पतीने तिला महागडी हिऱ्याचे दागिणे भेट म्हणून दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

रणवीरने करण जोहरसमोरच फोडलं सुहागरातचं गुपीत; म्हणाला, ‘आम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्येही…’

दीपिका आणि कॅटरिनाबाबत आलियाचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, ‘त्या दोघी मला…’

साऱ्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् सूनबाईंच्या शुभेच्छा दुसरीकडं, आलियाने बनवला नीतूंचा वाढदिवस खास

हे देखील वाचा