Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

आवडत्या अभिनेत्यासाठी काहीही! चाहत्याने छातीवरच काढला कार्तिक आर्यनच्या चेहऱ्याचा टॅटू, पाहून तोही शॉक

बॉलिवूडमध्ये आपण अनेक जबरदस्त चाहते पाहिले आहेत. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन् तास वाट पाहत असतात. बरेच चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतके फॉलो करतात की, ते फक्त त्यांच्यासारखेच दिसत नाहीत तर त्यांचे नाव किंवा चेहऱ्याचा टॅटू देखील करतात. अलीकडेच ‘धमाका’ फेम अभिनेता कार्तिक आर्यनसाठीही अशीच क्रेझ पाहायला मिळाली. कार्तिकच्या चाहत्याने त्याच्या छातीवर टॅटू बनवला, यादरम्यानचा एक व्हिडिओ जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पॅपराझी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कार्तिकचा (Kartik Aaryan) एक चाहता त्याला भेटायला आला होता. त्याच्या चाहत्याने सर्वप्रथम कार्तिकला गिफ्ट दिले आणि त्याचा टॅटू दाखवल्यानंतर त्याने छातीवर कार्तिकचा टॅटू बनवला असल्याचे सांगितले. यासोबतच चाहत्याने कार्तिकला छातीवरील पट्टी काढण्याची विनंती केली.

त्याच्या चाहत्याच्या या विनंतीवरून कार्तिकने चाहत्याच्या छातीवरील पट्टी काढली. मात्र, हे करत असताना कार्तिक थोडा घाबरला. जेव्हा कार्तिकने फॅनच्या छातीवर त्याच्या चेहऱ्याचा बनवलेला टॅटू पाहिला, तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. कार्तिकने चाहत्याला विचारले, हे कोणी बनवले? यावर प्रतिक्रिया देताना चाहत्याने हा टॅटू एका टॅटू आर्टिस्टने बनवला असल्याचे सांगितले. यानंतर कार्तिकने सोशल डिस्टन्सिंग पाळत फॅन्ससोबत अनेक पोझ दिल्या.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसे, कार्तिकची क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याच्या एका महिला चाहत्यानेही त्याचे नाव टॅटू करून घेतले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कार्तिकच्या बिल्डिंगखाली त्याच्या दोन महिला चाहत्या मोठ्या आवाजात त्याला भेटण्याची विनंती करत होत्या, त्यानंतर कार्तिक स्वत: इमारतीतून खाली उतरला आणि त्याच्या महिला चाहत्यांना भेटला.

कार्तिक आर्यनने २०११ मध्ये लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील कार्तिक आर्यनचे काम सर्वांनाच आवडले होते. या चित्रपटात तो एकटाच अभिनेता नसला तरी त्याने बोललेले लांबलचक एकपात्री प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

कार्तिकने आतापर्यंत ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका-छुपी’, ‘धमाका’ असे अनेक यशस्वी चित्रपट दिले.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा