Tuesday, April 16, 2024

‘या’ व्यक्तीने बिग बॉस फेम अर्शी खानच्या पोटात मारला जोरदार पंच, विव्हळत कोसळली खाली

बिग बॉसची माजी स्पर्धक असलेली अर्शी खान नेहमीच तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे चर्चेत असते. याशिवाय ती तिच्या सोशल मीडिया पोस्ट, तिची विवादित वक्तव्य यांमुळे देखील प्रकाशझोतात येत असते. मॉडेल आणि अभिनेत्री असणारी अर्शी सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सध्या अर्शी बॉक्सिंग शिकत आहे. बॉक्सिंग क्लासवेळी तिच्या सरावाचा एक व्हिडिओ अर्शीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिच्या फॅन्सला सुरुवातीला धक्काच बसला असेल. कारण व्हिडिओ तसाच आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की, अर्शी बॉक्सिंग रिंगमध्ये उभी असून, तिचा ट्रेनर आर्शीच्या पोटात एक पंच मारतो आणि अर्शी विव्हळत खाली कोसळते. तिचा हा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना अर्शीने कॅप्शनमध्ये लिहिले, “त्रासदायक.” मात्र अचानक अर्शी बॉक्सिंग का शिकत आहे, हा प्रश्न अनेकांना पडला असून, काहींनी त्यावर अंदाज बांधत तिच्या आगामी भूमिकेची तयारी असे म्हटले आहे. बार्शीला आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग खेळायचे असून पुरुषांच्या तोडीस तोड स्पर्धा करायची आहे.

अर्शी खानचा काही दिवसांपूर्वीच एक जीवघेणा अपघात झाला होता, मात्र सुदैवाने ती या अपघातातून वाचली. अर्शी नेहमीच तिच्या भांडणामुळे अधिक लाईमलाइट मिळवते. बिग बॉसमध्ये स्पर्धकांसोबत आणि सलमान खानसोबत झालेली तिची भांडणं तुफान गाजली होती. अर्शी खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने आतापर्यँत “विश ” आणि सावित्री देवी कॉलेज एंड हॉस्पिटल ” सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. अर्शीने आतापर्यंत काही बॉलिवूड सिनेमात तर काही दाक्षिणात्य सिनेमात काम केले असून, ती काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील झळकली आहे. तिने २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र नंतर तिने राजीनामा देखील दिला.

हेही वाचा :

विकी कौशलने साली इसाबेल कैफला दिल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा

अक्षय खन्नासोबत डेब्यू करणार होती बिपाशा, लग्नाआधी केले ‘या’ ३ अभिनेत्यांना डेट

Supriya@61: शाहिद कपूरची सावत्र आई असलेल्या सुप्रिया पाठक यांचा ‘हंसा पारेख’ होण्याचा थक्क करणारा प्रवास

हे देखील वाचा