Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड ‘त्या’ एका गोष्टीमुळे कार्तिक आर्यन ट्रोलर्सच्या निशाण्यावर; सलमान खानचे नाव घेत म्हणाले…

‘त्या’ एका गोष्टीमुळे कार्तिक आर्यन ट्रोलर्सच्या निशाण्यावर; सलमान खानचे नाव घेत म्हणाले…

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कार्तिक हा सर्वात ‘डाऊन टू अर्थ’ असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये कार्तिक रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्स त्याला ट्रोल करत आहेत. कार्तिकने भाईजान सलमान खानची कॉपी केल्याचे युजर्स म्हणत आहेत.

कार्तिक आर्यन मुंबईच्या रस्त्यावर दिसला सायकल चालवताना
व्हिडिओमध्ये कार्तिक (Kartik Aaryan) फुटबॉल खेळून झाल्यानंतर सायकलवरून त्याच्या घरी जाताना दिसत आहे. कार्तिक कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. शर्ट-पँट परिधान केलेल्या कार्तिकने डोक्यावर पट्टी बांधली आहे. कोव्हिड- १९ प्रोटोकॉलचे पालन करत कार्तिकने मास्क लावला आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कार्तिकने सलमानची (Salman Khan) कॉपी केल्याचे अनेक युजर्स म्हणताना दिसले, तर अनेकांनी ग्राऊंडेड झाल्याबद्दल अभिनेत्याचे कौतुक केले.

एका युजरने लिहिले की, “लक्ष वेधण्यासाठी तो सलमान खानची कॉपी करत आहे.” आणखी एका युजरने कार्तिकची स्तुती करताना लिहिले की, “अहंकार नाही, शो ऑफ नाही, कार्तिकला वाटले की सायकल चालवावी, तर त्याने ती चालवली, तो भूमिशी जोडलेला अभिनेता आहे.” अनेक महिला युजर्सने कार्तिक आर्यनला क्यूट म्हटले.

कार्तिक आर्यनने २०११ मध्ये लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील कार्तिक आर्यनचे काम सर्वांनाच आवडले होते. या चित्रपटात तो एकटाच अभिनेता नसला तरी त्याने बोललेले लांबलचक एकपात्री प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यानंतर कार्तिकने ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका-छुपी’, ‘धमाका’ असे अनेक यशस्वी चित्रपट दिले.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘भूल भुलैया २’, ‘शहजादा’, ‘फ्रेडी’, ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा