Monday, July 1, 2024

कोट्यवधी रुपयांची कार गिफ्ट करणाऱ्या निर्मात्याच्या वाढदिवशी बेभान होऊन नाचला कार्तिक, पाहा व्हिडिओ

सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष चढ-उताराचे राहिले. काही चित्रपट चांगले चालले, तर काही चित्रपट खूपच फ्लॉप ठरले. हिट ठरलेल्या सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या ‘भूल भुलैय्या 2‘ या सिनेमाचाही समावेश आहे. अभिनेत्याच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तींमध्ये टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश होता. भूषण यांनी रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) 45वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने कार्तिक आर्यनकडून त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मिळाल्या.

कार्तिककडून भूषण कुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्यासोबत ब्लॉकबस्टर ‘भूल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाच्या टायटल ट्रॅकवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत दिसते की, कार्तिक आर्यन काऊचवर चढून डान्स करत आहे. तसेच, भूषण कार्तिकच्या डान्स स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्तिक आर्यन आणि भूषण कुमार (Kartik Aaryan And Bhushan Kumar) हे दोघेही बेभान होऊन डान्स करताना दिसत आहेत.

कार्तिकने शेअर केला व्हिडिओ
कार्तिक आर्यन याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “सर्वात आनंदा निर्मात्याला वाढदिवसाच्या ब्लॉकबस्टर शुभेच्छा.” त्याच्या या व्हिडिओवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. त्याची ही पोस्ट आतापर्यंत 3 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केली आहे. तसेच, अभिनेत्याच्या चाहत्यांनी भूषण कुमार यांना कमेंटमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

‘भूल भुलैय्या 2’ हिट झाल्यानंतर गिफ्ट केलेली महागडी कार
विशेष म्हणजे, कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या 2’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर भूषण कुमार अभिनेत्यावर भलतेच खुश झाले होते. त्यांनी कार्तिकला जवळपास 3.72 कोटी रुपयांची मॅकलॅरेन जीटी ही गाडी भेट म्हणून दिली होती. रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या या सिनेमाने तब्बल 200 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनचे आगामी सिनेमे
‘भूल भुलैय्या 2’ या सिनेमानंतर कार्तिक आर्यन ‘फ्रेडी’ (Freddy) या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर 2 डिसेंबर, 2022 रोजी स्ट्रीम होणार आहे. याव्यतिरिक्त अभिनेता ‘शहजादा’ (Shehzada) या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला होता. (actor kartik aaryan wishes producer bhushan kumar on his birthday see viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भल्याभल्यांना मागे टाकत 8 वर्षीय गुंजन बनली ‘झलक दिखला जा 10’ची विनर, जिंकले ‘एवढ्या’ लाखांचे बक्षीस

शिल्पा शेट्टीने मुंबईच्या रस्त्यावर वाटला पिझ्झा, व्हिडिओ पाहून युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

हे देखील वाचा