Friday, May 24, 2024

किस कसं करावं हेही कार्तिक आर्यनला नव्हतं माहिती! 37 रिटेकनंतर मिळाला होता परफेक्ट शॉट

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने जवळपास 20 0कोटींची कमाई करून, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिकचा बॉलिवूडमध्ये दर्जा वाढला आहे. चाहत्यांना कार्तिक रोमँटिक आणि कॉमेडी अशा दोन्ही चित्रपटात आवडतो. त्याचवेळी तो त्याच्या प्रत्येक चित्रपटात रोमान्स करताना दिसत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की एकदा किसिंग सीन शूट करताना त्याला 37 रिटेक द्यावे लागले, ज्यामुळे तो परेशान झाला होता.

ही किस्सा 2014 मध्ये आलेल्या सुभाष घई (Subhash Ghai) यांच्या ‘कांची: द अनब्रेकेबल’ या चित्रपटाची आहे. या चित्रपटात कार्तिकला मुख्य अभिनेत्री मिष्टीसोबत एक किसिंग सीन द्यायचा होता, जो त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. कारण चॉकलेट बॉयची प्रतिमा असलेल्या कार्तिकला किस कसे करायचे, हेच माहित नव्हते. सुभाष घई सतत त्यांचे सीन्स नाकारत होते, त्यामुळे ते चांगलेच संतापले. 37 रिटेक केल्यानंतर, सुभाष घई अचूक शॉट घेऊ शकले. (when kartik aaryan doesnt know how to kiss had to do 37 retakes)

एका मुलाखतीदरम्यान कार्तिक आर्यनने ही माहिती दिली. कार्तिक म्हणाला होता, “सुभाषजींना सीनमध्ये पॅशनेट किस हवी होती आणि मला कसे किस करावे हे माहित नव्हते. खूप रिटेक झाल्यावर मी त्यांना विचारणार होतो की, साहेब, तुम्हीच करून दाखवा कसे करायचे ते. किसिंग सीन एवढी मोठी डोकेदुखी ठरेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. शेवटी 37 रिटेकनंतर त्यांना हवा असलेला शॉट मिळाला.” मात्र, आता कार्तिक आर्यन त्याच्या प्रत्येक चित्रपटात किसिंग सीन करताना दिसत आहे.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा चित्रपट ‘भूल भुलैया २’ पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे आणि आता तो OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर देखील आला आहे. त्याचबरोबर आता तो रोहित धवन दिग्दर्शित ‘शेहजादा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघांनी ‘लुका छुप्पी’मध्ये काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंजिनिअर असलेला कार्तिक आर्यन का आला सिनेसृष्टीत ? 1500 रुपयाचा होता पहिला चेक
‘अन्न तू नाही अल्लाह देतो’, जेव्हा सर्वांसमोर सलमान खानवर चिडल्या होत्या कोरिओग्राफर सरोज खान

हे देखील वाचा