Wednesday, July 16, 2025
Home भोजपूरी खेसारीने गां’जा पिऊन चालवली गाडी, शेजारी बसलेल्या अभिनेत्रीचाही उडाला थरकाप, व्हिडिओला ६ कोटी व्ह्यूज

खेसारीने गां’जा पिऊन चालवली गाडी, शेजारी बसलेल्या अभिनेत्रीचाही उडाला थरकाप, व्हिडिओला ६ कोटी व्ह्यूज

भोजपुरी सिनेसृष्टीत श्रावण महिना सुरू होण्याच्या एक महिना आधीच गाणी प्रदर्शित होऊ लागली होती. आता या सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध गायक आपापले नवीन गाणे प्रदर्शित करत आहेत. यामध्ये खेसारी लाल यादव याच्याही गाण्याचा समावेश आहे. खेसारीचे सर्वाधिक श्रावणातील गाणी प्रदर्शित झाली आहेत. नुकतेच त्याचे कांवड गाणे ‘देवघर में दर्द’ हे प्रदर्शित झाले होते. यामध्ये तो मेघाश्रीसोबत शंकराच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत होते.

यानंतर त्याचे ‘वरदान चाही तीन’ (Vardan Chahi Teen) हे गाणेही प्रदर्शित झाले होते. या गाण्यात त्याच्यासोबत नेहा पाठक (Neha Pathak) ही दिसत होती. दोघेही देवाकडे वरदान देण्याची विनंती करत होते. अशात आता त्याच्या एका जुन्या गाण्यालाही प्रेक्षकांची तुफान पसंती मिळताना दिसत आहे.

खरं तर, खेसारी लाल यादव याचे तरुणांच्या पसंतीस उतरलेले गाणे म्हणजे ‘सुना राजा पीके गां’जा’ (Suna Raja Pike Ganja) होय. या व्हिडिओत भगव्या कपड्यांमध्ये तो गां’जा फुकताना दिसत आहे. दुसरीकडे, त्याची सहअभिनेत्री त्याला नशेत गाडी चालवण्यापासून रोखत आहे. १६ श्रृंगाराने सजलेली अभिनेत्री शेजारील सीटवर घाबरलेली दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ६ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओवर ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ३७ हजारांहून अधिक कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.

गाण्याबाबत थोडक्यात
‘सुना राजा पीके गां’जा’ हे गाणे स्वत: खेसारी लाल यादव याने गायले आहे. विशेष म्हणजे, तोच या गाण्याचा मुख्य अभिनेता आहे. गाण्याचे बोल प्रकाश परदेशी यांनी लिहिले आहेत. दुसरीकडे, आर्या शर्मा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. खेसारीचे हे गाणे अलका फिल्म्स या अधिकृत युट्यूब चॅनेलवर एका वर्षापूर्वी म्हणजेच २० जुलै, २०२१ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता.

खेसारीचे नवीन गाणे ‘ब्रँडेड भक्त’ हे गाणेही धमाल करताना दिसत आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अनीषा पांडे (Anisha Pandey) शानदार अंदाजात दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘तू कुठे गरिबांमधला राहिलाय’, रिक्षावाल्याचा प्रताप सांगितल्यानंतर ‘सल्या’च्या चाहत्याची लक्षवेधी प्रतिक्रिया

‘तो फक्त ऍडल्ट फिल्मचा हिरो’, रणबीरबद्दलच्या प्रश्नावर नोराचे खळबळजनक विधान

ललित मोदींच्या संपत्तीपुढे सुष्मिताची संपत्ती ‘पाणी कम चाय’, एका सिनेमासाठी आकारते फक्त ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा