Tuesday, May 21, 2024

ललित मोदींच्या संपत्तीपुढे सुष्मिताची संपत्ती ‘पाणी कम चाय’, एका सिनेमासाठी आकारते फक्त ‘एवढे’ कोटी

आजपर्यंत भारतातील 3 सौंदर्यवतींनी ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला आहे. मात्र, सर्वात पहिल्यांदा हा मान पटकावण्याचा मान अभिनेत्री सुष्मिता सेन हिला मिळाला. सुष्मिताने 1994 साली भारताकडून पहिल्यांदा ‘मिस युनिव्हर्स’ या मोठ्या किताबावर आपले नाव कोरले होते. ‘मिस युनिव्हर्स’ बनल्यानंतर सुष्मिताने अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सुष्मिताला फक्त भारतातच नाही, तर जगभरात ओळखले जाते.

सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. मागील काही दिवसांपूर्वी ती रोहमन शॉल (Rohman Shawl) याच्यासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. आता ती व्यावसायिक ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

ललित मोदी यांनी नुकतीच घोषणा केली की, ते सुष्मिता सेन हिला डेट करत आहेत. सुष्मिताची सिनेकारकीर्द खूपच शानदार राहिली आहे. ती तिच्या आयुष्याचे निर्णय खूपच विचार करून घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ती आर्थिकदृष्ट्यादेखील स्वतंत्र आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. सुष्मिताच्या कमाईच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींच्या पुढे आहे. चला तर या लेखातून जाणून घेऊया सुष्मिताच्या संपत्तीबद्दल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

सुष्मिताने 25 हून अधिक सिनेमात आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. यामार्फत तिने बक्कळ पैसा कमावला आहे. वयाच्या 18व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’ (Miss Universe) किताब पटकावणारी सुष्मिता कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

सुष्मिताने 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या सिनेमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘मैं हूं ना’, ‘नायक’ यांसारख्या सुपरहिट सिनेमात आणि अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. यामार्फत तिने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

सुष्मिताची संपत्ती
सुष्मिता नव्वदच्या दशकापासून सातत्याने काम करत आहे. यावरून समजते की, तिने बक्कळ कमाई केली असेल. एका वेबसाईटनुसार सुष्मिताची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये इतकी आहे. सुष्मिता दर महिन्याला ६० लाख रुपयांची कमाई करते. सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर सुष्मिता एका सिनेमासाठी 3-4कोटी रुपयांची कमाई करते. ती मॉडेलिंगमधूनही चांगला पैसा कमावते. सुष्मिताच्या कमाईचे मोठे स्त्रोत हे ब्रँड प्रमोशन हेदेखील आहे. जाहिरातींमधून ती जवळपास दीड कोटी किंवा त्याहूनही अधिक रुपयांची कमाई करते. दुसरीकडे, माध्यमांतील वृत्तानुसार, ललित मोदी हे 4555कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

सुष्मिता सध्या ललित मोदी यांच्याशी नात्यात असल्यामुळे जोरदार चर्चेत आहे. त्यांनी लग्न केले नसले, तरीही ते आगामी काळात लग्न करू शकतात असे खुद्द ललित मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाविषयीही चर्चांना उधाण आले आहे.(actress sushmita sen lalit modi take a look at actress whopping net worth)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
शिव ठाकरेवर हाणामारीचा आराेप! सोशल मीडियावर हाेतेय शोमधून हाकालपट्टीची मागणी

सुष्मिता सेनला गिफ्टमध्ये कोणीच देऊ शकत नाही ‘डायमंड’, बॉयफ्रेंडही नाही; जाणून घ्या कारण

हे देखील वाचा