Wednesday, August 13, 2025
Home मराठी ‘देवमाणूस’ फेम अजितकुमारला अखेर ‘हळद लागली!’, अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करून दिलं खास सरप्राईज

‘देवमाणूस’ फेम अजितकुमारला अखेर ‘हळद लागली!’, अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करून दिलं खास सरप्राईज

अभिनेता किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) ‘लागीर झालं जी’ मालिकेतून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि महाराष्ट्राला देखणा खलनायक मिळाला. या मालिकेतील भैय्यासाहेबांच्या भूमिकेने किरणला घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. दमदार अभिनय आणि देखणा लूक यामुळे किरण गायकवाडने मराठी मालिका क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  आपल्या अभिनयांइतकाच तो सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओवर आणि फोटोवर त्याचे चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत असतात. मात्र किरण गायकवाडने अलिकडेच केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मात्र चांगलेच गोंधळात पाडले आहे. कारण किरणने त्याच्या लग्नातील हळदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे त्याने लग्न केल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. काय आहे या व्हिडिओ मागील सत्य चला जाणून घेऊ. 

अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन त्याच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नवरदेव झालेला किरण धमाल करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे किरण खरोखर बोहल्यावर चढतो की काय अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. मात्र हा व्हिडिओ त्याच्या सध्या गाजत असलेल्या ‘देवमाणूस २’ या मालिकेतील आहे. ही मालिका नवीन वळणावर आली असून मालिकेत किरण गायकवाड साकारत असलेल्या अजितकुमार देवचे लग्न होणार आहे. त्या कार्यक्रमाच्या सेटवरील हा व्हिडिओ आहे जो पाहून त्याचे चाहते गोंधळात पडले आहेत.

दरम्यान, किरण गायकवाडने ‘लागीर झालं जी’ मालिकेतून पदार्पण केले होते. या मालिकेने त्याला घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. मालिकेतील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. सध्या चर्चेत असलेल्या ‘देवमाणूस २’ मालिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही मालिका वाईमधील बोगस डॉ. संतोष पोळच्या जीवनावर आधारित आहे.

 

हेही वाचा- 

हे देखील वाचा