देवमाणूस मालिकेच्या टीमची जंगी पार्टी! किरण गायकवाडने व्हिडिओ शेअर करून दाखवली झलक

झी मराठीवरील एक मालिका या वर्षी खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेने महाराष्ट्रातील सर्वांनाच वेड लावले होते. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ चांगुलपणाचा पडदा घेऊन साध्याभोळ्या लोकांना फसवणारा राक्षस कशाप्रकारे लोकांचाच खून करतो, हे या मालिकेतून दाखवले आहे. या मालिकेमध्ये अनेक नवीन वळणं आली. डॉक्टर अजित कुमार देव म्हणजेच देवी सिंग हा अजूनही लोकांना कसे फसवत आहे, हे दाखवले जात आहे. अशातच ही मालिका लवकरच संपणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसेच या मालिकेचे शूटिंग संपवून कलाकार पार्टी करताना दिसत आहेत. याची झलक या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारा देवी सिंग म्हणजे अभिनेता किरण गायकवाड याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. (kiran gaikwad share a devmanus team party video on social media )

किरणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘देवमाणूस’ मालिकेची संपूर्ण टीम दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून हे लक्षात येत आहे. ते सगळे पार्टी करत आहेत. सगळेजण डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “हे काय गाणं आहे माहित नाही पण आवडलं आपल्याला.” त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. सगळेजण त्याला ‘देवमाणूस’ ही मालिका खरंच संपणार आहे का असे विचारत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kiran Shakuntla Gaikwad (@kiran_gaikwad12)

झी मराठीवर अनेक नवीन मालिका येणार आहेत. त्यात देवी सिंगच्या पापाचा घडा भरून त्याचा खरा चेहरा लवकरच गावासमोर येणार आहे आणि ही मालिका संपणार आहे. गेल्या एका वर्षात संपूर्ण महाराष्ट्राने या मालिकेला डोक्यावर घेतले होते. पण आता ही मालिका संपणार त्यामुळे प्रेक्षकांमध्ये बऱ्यापैकी नाराजीचे वातावरण दिसत आहे. या मालिकेत किरण हा खलनायकाच्या भूमिकेत असनूही त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. किरणने या आधी झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैयासाहेब हे पात्र निभावले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

Latest Post