Monday, June 23, 2025
Home मराठी राजकीय भुमिका घेतल्याने अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी? सोशल मीडियावर संतापाची लाट

राजकीय भुमिका घेतल्याने अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी? सोशल मीडियावर संतापाची लाट

अभिनेता किरण माने हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रासोबतच तो समाजातील विविध घटकांवर त्याचे मत व्यक्त करत असतो. राजकारणावर अनेकवेळा त्याने परखडपणे मत व्यक्त केलं आहे. अनेकवेळा टीका देखील केल्या आहेत. परंतु या त्याच्या बेधडकपणाचा त्याला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे.

किरण (kiran mane) हा स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’, या मालिकेत काम करत होता. तो मालिकेत माऊच्या वडिलांचे पात्र निभावत होता. मालिकेतील त्याचे पात्र देखील तेवढेच बिनधास्त आणि बेधडक होते. परंतु आता त्याला अचानक या मालिकेतून काढण्यात आले आहे. (Actor Kiran mane exit from mulgi zali ho serial)

निर्मात्यांच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त होत आहे. त्याचे चाहते या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर पोस्ट करून अनेकजण या गोष्टीला विरोध दर्शवत आहेत.

किरण मानेने काही दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुक पेजवरून राजकारणाबाबत एक पोस्ट केली होती. त्यात देखील त्याने अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. त्याच्या त्या पोस्टला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, तर अनेकांना त्याची ती पोस्ट अजिबात आवडली नव्हती. त्याला या मालिकेतून काढण्याचे त्याने सोशल मीडियावर घेलेल्या परखड राजकीय भुमिका, हेच कारण असावे असं बोललं जात आहे. ज्या कारणास्तव त्याला मालिकेतून काढण्यात आले, ते कारण त्याची स्पष्ट राजकीय भुमिका हेच असावे, असा कयास असल्याने, सोशल मीडियावर याबाबत संताप व्यक्त केला जातोय.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा