Tuesday, September 26, 2023

अभिनेते किरण माने ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत दिसणार ‘या’ भूमिकेत; अभिनेत्याने पोस्ट करून दिली माहिती

अभिनेते किरण माने हे नाव मराठी मनोरंजन विश्वात कुणाला माहीत नाही, असं कुणीही नसेल. अभिनेते किरण माने यांनी अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. ते अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये झळकले आहेत. त्यांनी स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम केले आहे. तेव्हा पासुन ते खूप प्रसिद्धीच्या झोतात आले. आता किरण माने लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत किरण माने महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

मराठी बिग बॉस सिझीन 4 नंतर किरण माने ( Kiran Mane) यांनी रावरंभा या सिनेमात छोटी भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा मालिकेत काम करणार आहे. या बद्दल किरण माने खूप उत्सुक आहेत. किरण माने हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. या भूमिकेविषयी त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती दिली आहे.

भूमिकेविषयी किरण माने काय म्हणाले?
या भूमिकेविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून किरण माने म्हणाले की, “आपल्या एखाद्या भूमिकेतनं, आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लै इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय. सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा ‘रियल लाईफ हिरो’, सिंधूताईंच्या आयुष्यातला ‘बाप’माणूस अभिमान साठे.
ज्याकाळात मुलांच्या बरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं. पाप मानलं जायचं. त्याकाळात ‘माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिनं शिकावं. मोठ्ठं व्हावं. तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नाव कमावेल’, हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं.”

तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणार्‍या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या. संकटांचा वर्षाव झाला. पण त्यानं हार मानली नाही. “फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर… नामाचा गजर सोडू नये” या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं. सिंधुताईंचं आयुष्यही लै लै लै भयाण संघर्षात गेलंय. आईलाही नकोशी असलेली ‘चिंधी’ ते अनाथांना हवीहवीशी माय ‘सिंधूताई’, हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाहीये. मालिकाविश्वात खूप वर्षांनी खरंखुरं, तरल, भावस्पर्शी, प्रेरणादायी आयुष्य येतंय. ‘कलर्स मराठी’वर, १५ ऑगस्टपासून, संध्याकाळी ७ वाजता ‘सिंधुताई माझी माई’ नक्की बघा. आपल्या मुलामुलींना तर आवर्जुन दाखवा.” त्यांच्या या पोस्टने सर्वींंचे लध वेधले आहे.

हे देखील वाचा