Monday, June 24, 2024

‘पक्ष वैगेरे खड्यात गेला…’ उदयनराजे भोसलेंच्या विजयावर किरण मानेची पोस्ट व्हायरल

काल म्हणजेच 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024चा निकाल जाहीर करण्यात आला. या दिवशी मतमोजणी झाली. राज्यात आणि देशात कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे निवडणुकीत उतरले होते. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना मागे सारून बहुमत मिळून विजय मिळवला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सध्या अनेक कलाकार देखील त्यांचे मत व्यक्त करत आहे. अशातच किरण माने यांनी उदयनराजे भोसले यांच्याबाबत अभिनंदन करणारी एक पोस्ट शेअर केलेली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या गळ्यात विजयी पताका पाहिल्यानंतर किरण माने यांनी पोस्ट शेअर केलेली आहे. ही पोस्ट शेअर करून त्यांनी लिहिलेले आहे की, “महाराज अभिनंदन आणि आनंद.. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचा विरोध आम्ही आयुष्यभर करणार. शशिकांत शिंदे साहेबांसाठी वाईटही वाटत आहे. पक्ष वगैरे गेला खड्ड्यात… आमचे महाराज या नात्याने तुम्ही निवडून आला त्याचा आनंद आहे.”

किरण माने हे नेहमीच भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात टीका करत असतात. परंतु उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून ही निवडणूक जिंकल्या तरी देखील त्यांनी त्यांचे अभिनंदन करणारी ही पोस्ट केलेली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट देखील केलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कार्तिक आर्यनची नवी हिरोईनचा चेहरा समोर, ‘चंदू चॅम्पियन’मध्ये या मोहिनीला मिळाली मोठी संधी
अक्षयच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला स्थगिती, निर्मात्यांना करावा लागतोय कमी बजेटचा सामना

हे देखील वाचा