जितेंद्र कुमार पुन्हा एकदा ‘कोटा फॅक्टरी’मध्ये धमाल करण्यास सज्ज झाला आहे. अलीकडेच ‘कोटा फॅक्टरी’ पर्व २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. टीव्हीएफच्या कोटा फॅक्टरीचे पहिले पर्व २०१९ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झाले होते, पण आता त्याचे दुसरे पर्व २४ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘कोटा फॅक्टरी’च्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
‘कोटा फॅक्टरी’ला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते आणि त्यामुळे जितेंद्र कुमारने एका रात्रीत प्रसिद्धी मिळवली होती. त्याचबरोबर ‘कोटा फॅक्टरी’च्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना त्याबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसऱ्या सत्रात कोणती कथा सादर केली जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ते आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या विद्यार्थ्यांना कळते की, त्यांचे आवडते फिजिक्स टीचर जितू भैया यांनी ट्यूशन सेंटर सोडले आहे.
ही कहाणी विद्यार्थ्यांचा संघर्ष दाखवते
दिग्दर्शक राघव सुब्बू म्हणाले की, “एक दिग्दर्शक म्हणून मी प्रेक्षकांना प्रेरणा देणाऱ्या आणि रोमांचित करणाऱ्या कहाणी तयार करण्याचा प्रयत्न करतो. ‘कोटा फॅक्टरी’चे पर्व २ कोटामधील विद्यार्थ्यांचा प्रवास आणि संघर्ष सांगत आहे.”
हे कलाकार दिसतील
या मालिकेत जितेंद्र कुमार, मयुर मोरे, रंजन राज, आलम खान, अहसास चन्ना, रेवती पिल्लई आणि उर्वी सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘कोटा फॅक्टरी’ ही भारतातील पहिली ब्लॅक अँड व्हाईट वेबसीरिज आहे जी कोटाच्या अवतीभोवती फिरते.
जितेंद्र कुमारने २०१३ मध्ये ‘मुन्ना जज्बती: द क्यू-टिया इंटर्न’मध्ये अभिनय केला होता. हे प्रचंड व्हायरल झाले होते आणि याला तब्बल ३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. तेव्हापासून, त्याने टीव्हीएफ व्हिडिओंमध्ये ‘टेक कॉन्व्हर्सेशन विथ डॅड’, ‘ए डे विथ’ मालिका, ‘कोटा फॅक्टरी’, ‘टीव्हीएफ बॅचलर’ सीरीज आणि बर्याच सीरिजमध्ये काम केले आहे. ज्यांनी एक दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. कोटा फॅक्टरी त्याच्या सर्वात मोठ्या हिटपैकी एक होती. यूट्यूबवरील टीव्हीएफ व्हिडिओं व्यतिरिक्त कुमारने कॉमेडी स्केच, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट
-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक
-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा