Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! एसएस राजामौलींच्या चित्रपटात महेश बाबूसोबत दिसणार दीपिका?

काय सांगता! एसएस राजामौलींच्या चित्रपटात महेश बाबूसोबत दिसणार दीपिका?

बाहुबली‘ आणि ‘आरआरआर‘ चित्रपटांच्या अफाट यशानंतर आता एसएस राजामौली त्यांच्या पुढील चित्रपटासाठी चर्चेत आहेत. चाहतेही त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, राजामौली यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाचे कामही सुरू केले आहे. चित्रपट निर्मात्याच्या या प्रकल्पाला SSMB29 असे तात्पुरती नाव देण्यात आले आहे.

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा कोणताही चित्रपट आला की, ताे चर्चेत असताे. माध्यमांतील वृत्तानुसार, सध्या फिल्ममेकर राजामौली त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिकेसाठी साऊथ सुपरस्टार महेश बाबू (mahesh babu) याला कास्ट केल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. लाेकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) या चित्रपटात सुपरस्टार महेश बाबूसोबत दिसणार आहे.

महेश बाबू साेबत दिसणार दिपिका
राजामौली यांच्या या प्रोजेक्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणला मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट केल्याचीही चर्चा आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटाची टीम दीपिकाला आपापसात कास्ट करण्यासाठी बोलणी करत आहे, पण या चित्रपटात महेशसोबत दीपिकाला अप्रोच करण्यात आले आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

प्राेजेक्ट केसाठी दीपिकाशी केला संपर्क
माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटाव्यतिरिक्त, दीपिकाला दिग्दर्शक नाग अश्विनच्या प्रोजेक्ट केसाठी देखील संपर्क साधण्यात आला आहे, ज्यामध्ये ती बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत दिसणार आहे. तसं पाहिलं तर दीपिका दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवण्याच्या तयारीत आहे. असे म्हणायला हरकत नाही.

या चित्रपटाशी निगडित लेखक विजेंद्र प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.” माहिती नुसार हा चित्रपट जंगल ऍडव्हेंचरवर आधारित आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होऊ शकते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
करण सिंग ग्रोवरच्या टॅलेंटला ताेड नाही, व्हिडिओ पाहूण चाहते झाले हैराण

कोण आहे हा अभिनेता? एकेकाळी रामायणात ‘लव’ची भूमिका साकारणारा, आज आहे चित्रपटसृष्टीचा आघाडी कलाका

हे देखील वाचा