Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड करण सिंग ग्रोवरच्या टॅलेंटला ताेड नाही, व्हिडिओ पाहूण चाहते झाले हैराण

करण सिंग ग्रोवरच्या टॅलेंटला ताेड नाही, व्हिडिओ पाहूण चाहते झाले हैराण

अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई-बाबा होणार आहे. करण सिंग ग्रोव्हर कायमच साेशल मीडियावर सक्रिय असताे आणि ताे त्याचे व्यायाम करताना आणि पेंटिंग करतानाचे फाेटाे आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करत असताे. बिपाशा बसूच्या बेबी बंपसोबत करणना बोलताना आपण अलिकडेच पाहिले. करणने बिपाशाच्या बेबी शॉवरसाठीही एक ग्रँड पार्टी दिली हाेती, ज्यामध्ये दाेघेही खूप आनंदी दिसत हाेते. अशातच करणने त्याचा आणखी एक व्हिडिओ साेशल मीडियावर शेअर केला आहे. करणचा हा लेटेस्ट व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये त्याचे टॅलेंट पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

करण (karan singh grover) याने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “हँड आय कोऑर्डिनेशन.” हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच खूप व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये ग्रोव्हर क्रिस्टल पीससोबत खेळताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

अभिनयाव्यतिरिक्त, करण बर्‍याच अ‍ॅक्टिव्हिटी करतो आणि नेहमी त्याच्या मल्टीटास्किंग कौशल्याने लोकांना आश्चर्यचकित करतो. करण एक चांगला बाबा बनेल यात काहिच शंका नाही. त्याच्या मल्टीटास्किंग काैशल्याने ताे त्याच्या चिमुकल्या बाळाला खूप आनंदात ठेवेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

करणचा ‘3 देव’ चित्रपट लवकरच हाेणार रिलीज
करण सिंग ग्रोवरच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर करणने ‘दिल मिल गये’, ‘कुबूल है’ यासारख्या दमदार मालिकेत काम केले. करणने टीव्ही मालिके व्यतिरिक्त सिनेमामध्येही काम केले आहे. त्याने ‘अलाेन’, ‘हेट स्टाेरी 3’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. आता करणचा ‘3 देव’ चित्रपच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात करण व्यतिरिक्त कुणाल रॉय कपूर, टिस्का चोप्रा यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! अंकित तिवारीच्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धू-धू धुतलं, पाहा व्हायरल व्हिडिओ

कोण आहे हा अभिनेता? एकेकाळी रामायणात ‘लव’ची भूमिका साकारणारा, आज आहे चित्रपटसृष्टीचा आघाडी कलाकार

हे देखील वाचा