मनीषा कोईराला ही 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या सौंदर्याने आणि आकर्षक अभिनयाने लोकांची मने जिंकली आहे. 1991मध्ये ‘सौदागर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मनीषाने अनेक अविस्मरणीय चित्रपट केले, ज्यासाठी तिने अनेक पुरस्कारही जिंकले. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मनीषाने बॉलीवूडमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आणि चित्रपट विश्वात स्थान मिळवले. मनीषा आज तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग जाणून घेऊया या खास दिवसा प्रसंगी त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास किस्से…
16 ऑगस्ट1970रोजी काठमांडू नेपाळ येथे जन्मलेल्या मनीषा कोईराला (Manisha koirala)यांचे आजोबा विश्र्वेश्र्वर प्रसाद नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत आणि वडील प्रकाश राजकारणात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. मनीषाची सुरुवातीची ओळख ही नेपाळी बॉलीवूड अभिनेत्री अशी आहे. त्यांनी 1989 मध्ये नेपाळी चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर 90च्या दशकात त्यांनी सलमान, शाहरुख, आमिर, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या अनेक मोठ्या बॉलीवूड कलाकारसोबत काम केले. ‘मुंबई एक्सप्रेस’, ‘1942: ए लव्ह स्टोरी’, ‘कच्चे धागे’, ‘लज्जा’, ‘चॅम्पियन’,’खौफ’, ‘बागी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचा चेहरा ठरलेल्या मनीषा कोईराला.
मनीषाचे वैयक्तिक आयुष्य खूप वेदनादायी होते. बॉलीवूडला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिल्यानंतर एक वेळ अशी आली की मनीषा कोईरालाचे करिअर उतरणीला लागले. या दु:खावर मात करण्यासाठी अभिनेत्रीने दारू आणि ड्रग्सचा सेवन करण्यास सुरुवात केली. मनीषा कोईराला यांनी 2010 मध्ये सम्राट दहलशी लग्न केले, परंतु हे लग्न फार काळ काही टिकले नाही आणि 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
2012 मध्ये मनीषाची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिला गर्भाशयात कर्करोग झाल्याचे समोर आले. या बातमीनंतर मनीषाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती काहीच विचार करु शकत नव्हती, तिला वाटले की हा कर्करोग तिचा जीव घेईल. मात्र, त्यानंतर मनीषा कोईराला यांनी न्यूयॉर्कमध्ये उपचार करून घेतले. जवळपास वर्षभराच्या उपचारानंतर ती बरी झाल्यावर तिने चाहत्यांना याबाबत माहिती दिली.
तिने केवळ या आजारावरच मात केली नाही तर तिने स्वतःच्या शरीराला पुन्हा पाहिल्यासारखं केलं. तिने तिच्या वर्कआउट आणि फिटनेस रूटीनचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यापैकी बास्केटबॉल खेळणे, सायकल चालवणे, जंगल वॉक करणे असे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. वयाच्या 53व्या वर्षीही मनीषा स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रचंड सजग असते. ती फक्त तिचं फिटनेस रूटीनच नाही तर तिच्या ग्लॅमरस शूटचे फोटोही शेअर करत असते.
मनीषा आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि तिची गाडी आयुष्याच्या मार्गावर वेगाने धावत आहे. कर्करोगातून बरे झाल्यानंतर मनीषा कोईराला यांनी तिचे ‘हील्ड: हाऊ कॅन्सर गव्ह मी अ न्यू लाइफ’ हे पुस्तक लाँच केले. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कष्टाची आणि संघर्षाची कहाणी सांगितली आहे. यानंतर, 2016मध्ये, तिने डियर माया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले होते.
बऱ्याच दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असलेली मनीषा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. मनीषा लवकरच कार्तिक आर्यन स्टारर ‘शहजादा’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘शहजादा’ अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्या तेलगू सुपरहिट चित्रपट ‘अला वैकुंठापुरमुलू’ चा रिमेक आहे. ‘शहजादा’ 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. मनिषा फक्त या चित्रपटात अभिनय करत नाहीये तर ती ती या चित्रपटाची निर्मातीदेखील आहे.
अधिक वाचा-
–‘या’ अभिनेत्रीने नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाच्या नात्याला पाडलं खिंडार, जीवापाड करायचे एकमेकांवर प्रेम
–‘या’ कारणामुळे पडली गोविंदा अन् डेविड धवन यांच्या नात्यात फुट, क्षुल्लक होते कारण