Thursday, November 30, 2023

‘या’ अभिनेत्रीने नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाच्या नात्याला पाडलं खिंडार, जीवापाड करायचे एकमेकांवर प्रेम

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये मनीषा कोईराला हिच्या नावाचाही समावेश होतो. मनीषाने आजवर अनेक हिट सिनेमात काम केले आहे. तिच्या प्रत्येक सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. मनीषाला इंडस्ट्रीत येऊन जेमतेम 5-6 वर्षे झाली होती. यादरम्यान तिचे दिग्गज अभिनेत्यासोबत नाव जोडले गेले होते. ते अभिनेते म्हणजे नाना पाटेकर होय. माध्यमांतील वृत्तांनुसार, नाना हे मनीषाच्या प्रेमात पडले होते. त्यांनी ‘अग्नीसाक्षी’ या सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमादरम्यानच त्यांच्यातील जवळीकता वाढली होती. मात्र, एका अभिनेत्रीमुळे त्यांच्यात दुरावा आला होता. कोण होती ती अभिनेत्री चला जाणून घेऊया…

माध्यमांतील वृत्तांनुसार, मनीषा कोईराला (Manisha Koirala) हिच्या शेजाऱ्यांनी अनेक वेळा नाना पाटेकर (Nana Patekar) यांना सकाळी सकाळी तिच्या घरातून बाहेर जाताना पाहिले होते. या सोबतच नाना पाटेकर यांनी खुलासा केला होता की, मनीषा देखील त्यांची आई आणि मुलांना बघण्यासाठी घरी येत जात असायची. त्यावेळी नाना पाटेकर हे त्यांच्या पत्नीपासून लांब राहत होते.

तसेच मनीषा कोईराला हिचे देखील ब्रेकअप झाले होते. त्यामुळे ती देखील खूप एकटी पडली होती. त्यावेळी ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, पण मनीषाने एकदा नाना पाटेकर यांना एका अभिनेत्रीसोबत पाहिले होते. ती अभिनेत्री म्हणजे आयशा जुल्का. या घटनेनंतर मनीषा आणि नाना पाटेकर यांचे रस्ते वेगळे झाले. ते दोघेही कायमस्वरूपी एकमेकांपासून लांब गेले. नाना पाटेकर यांना मनीषा सोडून गेल्याचे दुःख अनेक वर्षापर्यंत होते.

नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी ‘वेलकम’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘वेलकम बॅक’, ‘नटसम्राट’ ‘अग्नीसाक्ष’, ‘परिंदा’, ‘देऊळ’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. दुसरीकडे मनीषाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘सौदागर’, ‘यल्गार’, ‘बाँबे’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘अग्नी साक्षी’, ‘इंडियन’, ‘दिल से’, ‘मन’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे.(nana patekar was in love with manisha koirala)

अधिक वाचा- 
‘या’ कारणामुळे पडली गोविंदा अन् डेविड धवन यांच्या नात्यात फुट, क्षुल्लक होते कारण
एक- दोन लाखात खेळणाऱ्यातले नाहीत मांजरेकर, वाचा एका एपिसोडसाठी किती रुपये छापतात मराठी कलाकार

हे देखील वाचा