Tuesday, July 9, 2024

दुःखद! मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि प्रतिभावान अभिनेता मनोज वाजपेयी आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. आपल्या भूमिकांसाठी सतत चर्चेत असणाऱ्या मनोज यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.

मनोज यांचे वडील राधाकांत वाजपेयी यांनी रविवारी (३ ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र, आठवड्याभरापूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दिग्दर्शक अविनाश दास यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. ( actor manoj bajpayees father passed away after prolonged illness)

सप्टेंबरमध्ये त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तात्काळ दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांच्या आजाराची बातमी मिळाली, तेव्हा मनोज केरळमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यानंतर, बातमी मिळताच शूटिंग सोडून ते दिल्लीला रवाना झाले. मनोज यांचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत. तसेच त्यांना लाइमलाइटपासून दूर राहणेच पसंत होते. मृत्यूच्या वेळी ते ८३ वर्षांचे होते.

मनोज यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ते त्यांच्या पालकांच्या खूप जवळ आहेत. त्यांनी सांगितले होते की, वडिलांनी त्यांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आहे. त्यांनी मनोज यांचे नाव त्यांचे आवडते अभिनेता मनोज कुमार यांच्या नावावर ठेवले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा