Saturday, June 29, 2024

दुःखद | ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री शोकसागरात, लग्नाच्या काही वर्षातच कोरोनाने झाले पतीचे निधन

दक्षिण भारतीय अभिनेत्री मीना (meena) यांच्या पतीचे तामिळनाडूतील चेन्नई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. माध्यमातील वृत्तानुसार विद्यासागर यांच्यावर कोविड-१९ साठी रुग्णालयात उपचार सुरू होते. मीना यांच्या पतीला गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाला होता, ज्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते.

चित्रपटसृष्टीतील सदस्य आणि मीनाच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. “अभिनेत्री मीना यांचे पती विद्यासागर यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून धक्का बसला,” असे अभिनेता सरथ कुमारने मंगळवारी रात्री ट्विट केले.मीना यांनी २००९ मध्ये बेंगळुरूस्थित उद्योगपती विद्यासागर यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला नैनिका नावाची मुलगी आहे.

बाल कलाकार म्हणून सुरुवात केल्यावर, मीना १९९० आणि २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रमुख महिला भूमिका साकारणाऱ्या सर्वात जास्त मागणी असलेल्या कलाकारांपैकी एक बनली. मीनाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक टॉप स्टार्ससोबत काम केले आहे. अलीकडे, तिने मल्याळम चित्रपट ‘दृष्यम १’ आणि ‘दृष्यम २’ मध्ये यश मिळवले. शेवटच्या वेळी ती तेलगू चित्रपट – सन ऑफ इंडियामध्ये पडद्यावर दिसली होती. आईप्रमाणे नैनिकानेही बालकलाकार म्हणून काम केले आहे. ‘थेरी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात तिची भूमिका विजयच्या मुलीची होती. ती अरविंद स्वामींच्या भास्कर ओरू रास्कलमध्येही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा 

हे देखील वाचा