Friday, March 29, 2024

रांगड्या पुष्पाचं होणार फ्लाॅवर? ‘हा’ सुपरस्टार करणार अल्लू अर्जूनशी ‘पुष्पा टू’मध्ये दोन हात

सध्या सिने जगतात दाक्षिणात्य चित्रपटांचा मोठा बोलबाला पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक सुपरहीट चित्रपट देणाऱ्या दाक्षिणात्य सिनेजगताची जगभरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा बॉलीवूडचे चित्रपट निराशा करत होते. तेव्हा साऊथच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा: द राइज’च्या आगमनाने, थिएटर पुन्हा भरू लागले. पुष्पा या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. हा चित्रपट हिट झाल्यानंतर निर्मात्यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली होती की ते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासह लवकरच परतणार आहेत. आता या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. आता पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागात साऊथ स्टारची एन्ट्री होणार आहे. ज्यामुळे हा चित्रपट आणखी धमाकेदार होईल.

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandana) प्रमुख भूमिका असलेला पुष्पा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार पाहायला मिळाला होता. आता अल्लू अर्जुन आणि आता रश्मिका मंदान्नाची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. फहद फासिलनंतर आता विजय सेतुपतीही या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमार हा चित्रपट हिट करण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धती वापरत असल्याचे सांगितले जात आहे. विजय सेतुपतीची चित्रपटातील एन्ट्री जवळपास निश्चित झाली आहे. या चित्रपटात विजय सेतुपती एका खास भूमिकेत दिसणार आहेत, विजय सेतुपतीच्या एन्ट्रीची बातमी समोर आल्यानंतर चाहते खूप खूश दिसत आहेत.

चित्रपटातील विजय सेतुपतिच्या भूमिकेबाबत नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की  तो एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तो फहाद फासिलसारखा असेल की वेगळा असेल याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. पण प्रेक्षकांना आता या चित्रपटात डबल धमाका पाहायला मिळणार आहे, हे निश्चित. त्यामुळे चित्रपटात अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पा आणि पोलिसाच्या भूमिकेतील विजय सेतुपतिची जोरदार एक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा