Saturday, January 28, 2023

भारतीच्या प्रेग्नेंसीबद्दल मिथुन चक्रवर्ती यांनी हर्षची उडवली खिल्ली, सर्वांमध्ये पिकला हशा

कॉमेडियन भारती सिंग गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. लवकरच ती आई होणार आहे. पती हर्ष लिंबाचियासह भारतीने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. भारती सिंग प्रेग्नेंसीमध्येही काम करत आहे. नुकतीच ती पती हर्षसोबत ‘हुनरबाज’ शोमध्ये दिसली होती. यादरम्यान शोचे परीक्षक मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीसमोर तिचा पती हर्षची अशा प्रकारे खिल्ली उडवली की, सगळे हसले.

मला ४ वर्षे मारले टोमणे

कलर्स वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये हर्ष लिंबाचियाची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्यासमोर करण जोहर, मिथुन चक्रवर्ती आणि परिणीती चोप्रा परीक्षक म्हणून बसलेले दिसत आहेत. हर्ष लिंबाचिया मिथुन यांना म्हणतो, “प्रत्येक रियॅलिटी शोमध्ये मला टोमणे मारण्यात आले. ते कधी होत आहे? लग्नाला ४ वर्षे झाली. दादा तुम्हीपण एका एपिसोडमध्ये मला टोमणा मारलात. त्यामुळे ही गोष्ट मला खटकली आणि मला राग आला.” मग भारती स्टेजवर येते आणि म्हणते की, “आणि हे सर्व माझ्यावर आले. दादांनी आपली प्रतिभा दाखवली.” यानंतर मिथुन जोरात म्हणतात की, “मुबारक, मुबारक.”

मिथुन यांनी हर्षची उडवली खिल्ली

यानंतर भारती आणि हर्ष दोघेही मिथुन यांच्याकडे जातात. भारती सिंग म्हणते की, “दादा, सर्वप्रथम मला तुमच्या चरणांना स्पर्श करायचा आहे.” मिथुन चक्रवर्ती भारतीला विचारतात, “मी दिलखुलास बोललो तर तुला हरकत नाही.” भारती म्हणते सांग दादा. मिथुन म्हणतो, “जेव्हा मी त्याचे स्वरूप पाहिले तेव्हा मला वाटले नव्हते की, ते असे करू शकेल.” हे शब्द ऐकून सगळे जोरजोरात हसू लागतात, तर भारती आणि हर्ष एकमेकांचा चेहरा पाहू लागतात.

‘या’ दिवसापासून हा शो होणार सुरू

व्हिडिओच्या शेवटी हर्ष करण जोहरला म्हणतो की, “करण सर, तुम्ही याल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट घेऊन या कारण तुम्ही मुलाला लॉन्च कराल, नाही का?” जाताना भारती मिथुन चक्रवर्ती यांना म्हणाली की, “दादा, ज्यांना आता मुलं होत नाहीत, त्यांना कधीच सांगू नका की, तुमचा हूनर कुठे आहे?” भारतीच्या या शब्दांनी मिथुनच्या हशा पिकला. कलर्स टीव्हीवरील ‘हुनरबाज’ हा शो २२ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. या शोमध्ये देशभरातील स्पर्धक आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा