Saturday, January 28, 2023

अंकिता लोखंडेची लग्नानंतरची पहिली संक्रात झाली दणक्यात साजरी, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

या वर्षी अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाला सुरुवात झाल्याने नवीन जोडप्यांचे लग्ना नंतरचे पहिले सण साजरे होत आहेत. अशातच या वर्षी अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा बॉयफ्रेंड लग्न बंधनात अडकली आहे. लग्नानंतरची पहिलीच संक्रात तिची साजरी झाली आहे. तिच्या लग्नाचे सगळेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले आहेत. अशातच अंकिताची लनानंतरची पहिली संक्रात देखील चांगलीच जल्लोषात साजरी झाली आहे. तिने तिच्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अंकिताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने हलव्याचे दागिने घातले आहेत. तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे. तिने घरातील अनेक लोकांसोबत फोटो काढले आहेत आणि व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तिचा पती विकी जैन देखील दिसत आहे. तिचा हा सुंदर लूक अनेकांना आवडला आहे. तिचे चाहते तसेच अनेक कलाकार देखील या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (ankita lokhande’s video viral on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, ” कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !” तिच्या व्हिडिओवर अभिनेत्री अभिज्ञा भावेने हार्ट इमोजी पोस्ट केली आहे, तसेच अमृता खानविलकरने कमेंट केली आहे की, “किती किती सुंदर.”

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. यानंतर ती नावारूपाला आली. या मालिकेत तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. यानंतर तिने काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

हेही वाचा :

‘सामी सामी’ गाण्याचा सोशल मीडियावर ट्रेंड, छोट्या परीने देखील धरला ठेका

किरण माने प्रकरणावर समिर विद्वंस यांनी केले मत व्यक्त, सोशल मीडियावरील ट्विट ठरतंय लक्षवेधी

जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत ९ दिवसांनी अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

 

हे देखील वाचा