बॉलिवूडमधील कलाकारांना राजकारणात प्रवेश करताना आपण पाहिले आहे. यामध्ये आणखी एका दिग्गज अभिनेत्याच्या नावाचा समावेश आहे. ते अभिनेता इतर कोणी नसून ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे ‘मिथुन चक्रवर्ती’ आहेत. ते रविवारी म्हणजेच ७ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणार असल्याची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिगेड मैदानात होणाऱ्या रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत.
खरं तर मागील महिन्यात १६ फेब्रुवारीला मिथुन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यानंतर मिथुन यांच्या भाजप प्रवेशाबद्दल तर्क वितर्क लावले जात होते.
यापूर्वी मिथुन हे राज्यसभा सदस्य राहिले आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून राज्यसभा सदस्यपद भूषवले होते. ते एप्रिल २०१४ पासून ते डिसेंबर २०१६ पर्यंत या पदावर कार्यरत होते.
मिथुन आता पुन्हा एकदा राजकारणात काम करताना आपल्याला दिसणार आहे. त्यांचा जन्म १६ जून, १९६० रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला होता. ‘मिथुनदा’ हे त्यांचे निकनेम आहे. त्यांनी सन १९७७ साली ‘मृगया’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती.
त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले. त्यात ‘वीर’, ‘गोलमाल ३’, ‘अग्नीपथ’, ‘ओह माय गॉड’, ‘बॉस’, ‘डिस्को डान्सर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबतही काम केले आहे. त्यामध्ये ‘जॅकी श्रॉफ’, ‘धर्मेंद्र’, ‘गुलशन ग्रोव्हर’, ‘शक्ती कपूर’, ‘अमिताभ बच्चन’, ‘रेखा’, ‘मोहन जोशी’ यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनुराग कश्यप, तापसी पन्नू अडचणीत; तब्बल ६५० कोटींची हेराफेरी, आयकर विभागाला सापडले भक्कम पुरावे
-काय सांगता! अनुराग कश्यप आणि तापसी पन्नुच्या संपत्तीचे आकडे ऐकून तुमचेही फिरतील डोळे
-ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर सर्वोच्च न्यायालयाची नजर; म्हणाले, ‘पोर्नोग्राफी दाखवली जातेय’










