सिनेसृष्टीमधील सर्वच कलाकारांचे चाहते कोणत्याही एकाच जाती धर्माचे नसतात. हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, ख्रिश्चन अशा सर्व जाती धर्माचे नागरिक कलाकारांची जात नाही, तर अभिनय पाहून त्यांच्यावर प्रेम करत असतात. अशात अनेक वेळा हिंदू – मुस्लिम वादावरून मोठ्या दंगली होतात, शीत युद्ध होतात, काही मान्यवरांची बाचाबाची होते. या सर्व मुद्यांवर कलाकार आपले मत मांडताना थोडे घाबरतात. परंतु काही निर्भीड कलाकार देखील आहेत, जे पारदर्शकपणे आपल्या मनातील विचार जनतेसमोर मांडतात. त्यातीलच एक दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शाह.
नसिरुद्दीन यांनी आता पर्यंत अनेक वादग्रस्त विषयांवर आपले मत मांडले आहे. अशात अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या तालिबान्यांच्या अमानुषतेवर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. ज्यावरून काहींनी त्यांच्या विधानाची चर्चा केली, तर काहींनी त्यांना ट्रोल केले. अशातच आता त्यांनी बॉलिवूडमधील तीन खानवर निशाणा साधला आहे. या तीन खानांच्या यादीमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांची नावे आहेत. हे तिन्ही कलाकार त्यांची प्रसिद्धी कमी होईल या भीतीने कोणत्याही धार्मिक मुद्यावर आपले मत मांडणे टाळतात, असे नसिरुद्दीन यांचे म्हणणे आहे.
नसिरुद्दीन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, “सहाजिकच ते कलाकार त्यांना पुढे होणाऱ्या त्रासामुळे चिंतेत आहेत. मी त्यांच्याविषयी नाही बोलू शकत. पण मी कल्पना करू शकतो की, त्यांच्याकडे गमावण्यासारखे खूप काही आहे. फक्त त्यांची प्रसिद्धी नाही, तर सगळीकडूनच त्यांचे शोषण केले जाईल. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आणि सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांच्यावर संकट ओढावेल.”
ते पुढे म्हणाले के, “भारतीय सिनेसृष्टीमध्ये अद्यापतरी धार्मिक भेदभाव आणि इस्लामला विरोध असे काही नाही. परंतु आता प्रो एस्टेब्लिशमेंट चित्रपट बनवण्यासाठी सरकारकडून चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा मिळत आहे.” एवढेच नाही, तर त्यांनी देशाची तुलना नाजी जर्मनीबरोबर देखील केली. ते म्हणाले की, “नाजी जर्मनीमध्ये असंच व्हायचं. तिथे सरकार नाजीच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार होईल असे चित्रपट बनवायला सांगायचे. सध्या भारतीय चित्रपटांविषयी माझ्याकडे तसे ठोस पुरावे नाहीत. पण ज्या पद्धतीचे चित्रपट सध्या येत आहेत त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता.” अशा पद्धतीचे वक्तव्य करून नसिरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खास मित्रासह अंडरवॉटर मजा करताना दिसली ‘सोनू’; बिकिनी लूकने तर सर्वांनाच केलंय चकित
-ट्रेंडिंग गाण्यावर ‘स्वीटू’नेही धरला ताल, गोड अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा