ट्रेंडिंग गाण्यावर ‘स्वीटू’नेही धरला ताल, गोड अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा


‘मम्मीची एक फाईट आणि वातावरण टाईट’ हा डायलॉग आठवतोय ना? आठवणारच !‌ २०१९ मधील गर्ल्स चित्रपटातील या डायलॉगने सर्वांना वेड लावले होते. यासोबत वेड लावले या चित्रपटातील मती, मॅगी आणि रुमीने. यातील बिनधास्त, बेधडक आणि वेळ आल्यावर डायरेक्ट हातापायीवर येणारी रुमी म्हणजे अन्विता फलटणकर. याच चित्रपटातून एक गुबगुबीत, क्यूट अभिनेत्री सर्वांसमोर आली. सध्या अन्विता जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

अन्विताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग असणाऱ्या एका गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळया रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा सलवार घातला आहे. यामध्ये ती फार सुंदर दिसत आहे.
(Marathi actress Anvita faltankar’s dance video viral on social media)

तिने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर सातत्याने कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर ऋता दुर्गुळे हिने कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तू कमाल डान्सर आहे.”

‌अन्विता सध्या झी मीडियावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेत तिच्यासोबत शाल्व किंजवडेकर हा मुख्य भूमिकेत आहे. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ओम आणि स्वीटू हे दोघे झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय जोडपे आहे. प्रेक्षक त्यांना खूप प्रेम देतात. अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. शाल्वने देखील अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘हंटर’, ‘मेड इन हेवन’, ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.