Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार

अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार

अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी त्याच्या अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तो नेहमी त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. ‘बंजरंगी भाईजान’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटांमुळे नवाजुद्दीन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या पत्नीसोबतच्या वादामुळे तो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहे.

नवाज याची पत्नी आलिया हीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर त्याच्या सख्या भावाने नवाजवर आरोप करत म्हणाला की, तो असा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तसा तो नाही’ असे म्हणत त्याने नवाज गंभीर आरोप केले. यामुळे त्याने त्याचे घर सोडले असून, तो सध्या एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजत आहे.

नवाज (Actor Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या वर्सोवा येथील बंगल्यावर आईला भेटायला गेला. पण नावाजचा सख्या भाऊ फैजुद्दीन याने आईला भेटण्यासाठी नकार दिला. त्याच्या कुटुंबात चालू असलेले वाद आणखी वाढून टोकाला जाऊ नये अशी त्याच्या आईची इच्छा आहे. त्यामुळे आजारी आईला भेटण्यापासून अडवलं असं सांगण्यात येत आहे.

नावाजची पत्नी आलिया हिने त्याच्यावर गंभीर आरोप लावले आहे. हे वाद संपता संपेना अशी काहीशी परिस्थिती असल्याने त्याची आई अस्वस्थ आहे. म्हणूनच नवाज त्याच्या आईला भेटायला गेला होता पण त्याल गेटवरच अडवूं ठेवलं याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

तसेच नवाज त्याच्या सर्व वडिलोपार्जित मालमत्तेची पॉवर ऑफ अॅटर्नी त्याचा भाऊ अलमासुद्दीनच्या नावावर केली आहे. अल्मासुद्दीन हा पेशाने वकील आहेत. दुसऱ्या दस्तऐवजात त्याने मृत्यूपत्र तयार केले आहे, की तो जिवंत असेपर्यंत त्याच्या मालमत्तेवर त्याचा हक्क असेल. असं नावाजचा वकील प्रशांत शर्मा यांनी माध्यमांशी सवांद साधताना सांगितले आहे. (actor nawazuddin siddiqui controversy about his personal life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काहे दिया परदेस फेम ‘ऋषी सक्सेना’ याच्या वाढदिवसाच्या निमित्त गर्लफ्रेंड ईशाची खास पोस्ट
हातात हत्यारं घेऊन तब्बल 25 गुंडांचा दिलीप जोशी यांचा घराला घेराव, मुंबई पोलीस अलर्ट

हे देखील वाचा