Friday, December 8, 2023

काहे दिया परदेस फेम ‘ऋषी सक्सेना’ याच्या वाढदिवसाच्या निमित्त गर्लफ्रेंड ईशाची खास पोस्ट

अभिनेता ऋषी सक्सेना याचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म ३ मार्च १९९० रोजी झाला. आज त्याचा ३३ वाढदिवस. त्याने ‘काही दिया परदेस’ या मराठी मालिकेतुन मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या मालिकेत त्याने ‘शिव’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याच्या सोबत मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गौरी’ हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे दोघांनाही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या मालिकेला खूप प्रेम आणि पसंती दिली होती. त्यामुळे शिव आणि गौरी म्हणजेच ऋषी आणि सायली हे दोघेही या मालिकेतून घराघरात पोहोचले.

‘ऋषी’ हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतोच पण, तो सध्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. ऋषी (rishi saxsena) हा जय मल्हार मधील सर्वांची लाडकी बानू म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) हिच्या सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे ते दोघेही चर्चेत आहे. ते दोघे हि सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर असतात. ते दोघेही एकमेकांना डेट करत असून दोघांनीही वेळोवेळी एकमेकांबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे.

ऋषीच्या वाढदिवसानिमित्त ते दोघेही फिरायला गेले आहेत. यावेळी इशा केसकर हिने ऋषी याच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते दोघेही रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओ कॅप्शन लिहिले आहे की, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तू तू खरंच सर्वोत्कृष्ट आहेस. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

 

यावेळीचा एक व्हिडीओ ईशाने शेअर केला आहे. यात ते दोघेही रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना ईशा म्हणाली, “ऋषी सक्सेना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू खरंच सर्वोत्कृष्ट आहेस. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.”

या दोघांची पहिली भेट चला हवा येऊ द्या या शोच्या सेट वर झाली होती. ऋषीला बघताच इशा त्याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर त्या दोघांच्या अनेक पुरस्कारात भेटीगाठी झाल्या. ईशाने राहवलं गेलं नाही एके दिवशी तिच्या मनातल्या भावना त्याला बोलून दाखवल्या. मात्र आपल्यात फारशी ओळख नाही म्हणून त्याने तिला नकार दिला. असं असलं तरी त्यांच्या भेटीगाठी सुरूच होत्या. एके दिवशी ऋषीने तिला भेटायला बोलावले. ती जेव्हा त्याला भेटली तेव्हा तुला कोणती मुलगी आवडलीये का असे तिने गमतीने विचारले. मात्र ती असं का विचारतेय असा प्रश्न त्यानेच तिला विचारला. अशा अनपेक्षित प्रपोजने ती गोंधळली. त्यानंतर तिने विचार करायला थोडा वेळ घेतला. काही वेळाने तिने त्याला होकार दिला.(kahe diya pardes fame actor rishi saxena birthday special post by girlfriend actress isha keskar)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांनी केली त्यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

हे देखील वाचा