Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड मोठ्या मनाचा अभिनेता! नवाजुद्दीनला आवडत नाहीत बॉलिवूड पार्ट्या; म्हणाला, ‘सामान्य लोकांमध्ये राहायला आवडतं’

मोठ्या मनाचा अभिनेता! नवाजुद्दीनला आवडत नाहीत बॉलिवूड पार्ट्या; म्हणाला, ‘सामान्य लोकांमध्ये राहायला आवडतं’

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये गणला जातो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक सिनेमात उत्तम व्यक्तीरेखा साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नवाजुद्दीनसाठी २०२१ हे वर्ष खूप चांगले गेले. त्यांच्या अनेक चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले. तो सिनेमामध्ये पडद्यावर वेगवेगळ्या प्रकारची पात्रे साकारताना प्रेक्षकांनी पाहिले. हे सिनेमे पाहून असे वाटले की, काळाच्या ओघात त्याच्या अभिनयात आणखीनच सुधारणा झाली आहे. एका मुलाखतीत, अभिनेत्याने त्याच्या भविष्यातील योजना, बॉलिवूड आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. यावेळी त्याने तो बॉलिवूडच्या झगमगत्या पार्टीमध्ये दिसत नाही, याबद्दलही सांगितले.

अभिनय करण्याची आणि काही स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा नवाजुद्दीनला मुंबईत घेऊन आली. त्याच्याकडे फक्त अभिनयाची आवड होती, त्यामुळेच तो आज जगभर प्रसिद्ध आहे. त्याला एमी अवॉर्डमध्ये नामांकन मिळाले, कान्स आणि बुसान सारख्या चित्रपट महोत्सवात त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला की, अशा पुरस्कारांमुळे तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात की, नाही हे जाणवते.

नवाजुद्दीनने ग्लॅमरस जगापासून अंतर ठेवले आहे
नवाजुद्दीनला जगातील प्रत्येकाने त्याचे चित्रपट पाहावेत, असे वाटते. जरी त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसला तरीही. या अभिनेत्याला त्याच्या कामामुळे भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र, तो लाइमलाइटपासून दूर राहतो. सिनेमांमध्ये असूनही तो ग्लॅमरच्या जगापासून दूर राहला आहे.

नावाजुद्दीनला वास्तववादी सिनेमे करायला आवडतात
नवाजुद्दीनला जेव्हा या चकचकीत जगापासून दूर राहण्याचे कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला की, “मी ज्या प्रकारचे वास्तववादी सिनेमे करतो, वास्तविक जीवनात मी तसाच आहे.” तो म्हणतो की, “माणूस जितका लोकल असतो, तितकाच तो ग्लोबलही असतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या मुळाशी जोडलेले राहिला, तर जगभरातील लोकांना तुम्ही आवडाल.”

नवाजुद्दीनला सर्वसामान्यांमध्ये राहायला आवडते
अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्याला ग्लॅमर आणि स्टारडमची दुनिया आवडत नाही. त्याला सर्वसामान्यांमध्ये राहायला आवडते. बॉलिवूडच्या पार्ट्यांबद्दल तो म्हणतो की, त्याला फिल्म इंडस्ट्रीतील पार्ट्या आणि कार्यक्रम खूप खोटे वाटतात. त्यामुळे त्याला हे सर्व आवडत नाही.

हेही वाचा-

 

हे देखील वाचा