Monday, July 1, 2024

‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन

अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. ती तिच्या मादक अवतारामुळे, बोल्ड ड्रेसमुळे बऱ्याचदा ट्रोलिंगची शिकार होताना दिसते. अनेकदा तर नियाला ऑनलाईन हॅरॅसमेंटचा म्हणजेच छळाचा देखील सामना करावा लागला आहे. तिला तिच्या ड्रेसिंग आणि फोटोशूटसाठी बऱ्याच वेळा अश्लील प्रतिक्रिया मिळतात. मात्र निया यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत तिचे काम करते. पण कधीकधी निया देखील या ट्रोलर्सला सडेतोड उत्तरंसुद्धा देते.

अलीकडेच निया शर्माने दिलेल्या मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला विचारले गेले की, ती ट्रोल्सचा सामना कशी करते? तेव्हा ती उत्तर देताना म्हणाली की, “बऱ्याच वेळा मला कपड्यांमुळे चांगले बोलले जात नाही आणि मला माहिती आहे ते असच बोलणार. ‘लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, चर्चेचा विषय ठरण्यासाठी मी माझे कपडे काढत असते’ अशा कमेंट केल्या जातात. हे सर्व कुठून आले? मी मागील दहा वर्षांपासून लोकांचे लक्ष वेधण्याचेच काम करत आहे का? मी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मी लोकप्रिय आणि प्रसिद्ध देखील आहे. मग मी असे का करेल? लोकांना हे समजायला हवे की, मी कोणाचेही लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी असे कपडे घालण्याचा मार्ग निवडलेला नाही. हा माझा अजेंडाच नाही.’

‘मला वेगळ्या आणि खास पद्धतीचे ड्रेसअप करायला आवडते. ते पाहून चुकीच्या पद्धतीने कमेंट करणे हे माहिती नाही कधीपर्यंत सुरु राहणार. आता लोकांनी हे स्वीकारायला हवे कारण मी तर माझी ड्रेसिंग स्टाईल कोणासाठी बदलणार नाही. आणि राहिला प्रश्न ‘दो घूंट’ गाण्यात मी घातलेल्या ड्रेसचा तर ते कपडे माझ्या डिझायनरनेच माझ्यासाठी निवडले होते. हा ड्रेस मी घालावा असे माझ्या प्रॉडक्शन टीमकडूनच मला सांगण्यात आले होते.”

निया शर्माचा नुकताच प्रदर्शित झालेला म्युजिक व्हिडिओ ‘दो घुंट’ सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्याबद्दल निया म्हणाली, “रेट्रो एराचा एव्हरग्रीन डान्स ट्रॅकचा एक भाग असणे माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. मुमताजजी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीनी ट्रॅफ परफॉर्मन्स केले आहे. तसेच मला करायला मिळणे, ही मी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट समजते. मी कोरिओग्राफर जयश्री आणि गणेश आचार्य सरांचे आभार मानते. मला आशा आहे की, माझ्या चाहत्यांना हे गाणे आवडेल.”

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: कितीही व्यस्त स्केड्युल असले, तरीही आईसोबत वेळ घालवणे विसरत नव्हता ‘खिलाडी’ अक्षय कुमार

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

हे देखील वाचा