Monday, July 15, 2024

एक-दोन नाही, तर पवन कल्याणने 3 वेळा थाटलाय संसार; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी!

साऊथ सुपरस्टार पवन कल्याण याचा फक्त इंडस्ट्रीमध्येच नाही, तर राजकारणातही याचा दरारा आहे. टॉलिवूडचा जबरदस्त अभिनेता म्हणून पवन कल्याणला ओळखले जाते. त्याने तेलुगू इंडस्ट्रीला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. पवन याने शुक्रवारी (दि. 02 सप्टेंबर) त्याचा 51वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या खास दिवशी त्याच्या आयुष्यातील खास किस्से जाणून घेऊया.

साऊथ सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) हा साऊथचा मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांचा छोटा भाऊ आहे. पवनने आपल्या दमदार अभिनय आणि चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्याने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. पवन कल्याण फक्त अभिनेताच नाही, तर चित्रपट निर्माता, स्टंट को-ऑर्डिनेटर, गायक, कोरियोग्राफर आणि एक राजकारणी देखील आहे.

पवन कल्याणचा जन्म 2 सप्टेंबर, 1971 रोजी आंध्रप्रदेशमधील बपतला या गावात झाला आहे. ऑनस्क्रीनवर पवन कल्याण या नावाने ओळखले जात असले, तरी त्याचे खरे नाव कोन्निडेला कल्याण बाबू असे आहे. त्याने आपल्या करिअरची  सुरुवात 1996 मध्ये ‘अक्कड अम्माई इक्कड अब्बई’ या चित्रपटामधून केली होती. या नंतर त्याने आपल्या अभिनयाने खूप चित्रपटे गाजवले होते. त्याच्या दमदार अभिनयासाठी 1998 मध्ये ‘ठोली प्रेमा’ या चित्रपटायाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच्या व्यतीरिक्त त्याच्या अनेक चित्रपटासाठी त्याला पुरस्कार मिळाले होते.

पवन कल्याण जेवढा व्यावसायिक आयुष्यासाठी ओळखला जातो, त्याच्यापेक्षाही जास्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखला जोतो. त्याने एकूण तीन लग्न केले आहेत. त्याच्या तिन्ही बायका देश आणि विदेशातल्या आहेत. त्याचे पहिले लग्न 1997 मध्ये नंदिनीसोबत झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. 2008 मध्ये ते वेगळे झाले. यानंतर पवन कल्याण याने 2009 मध्ये रेणू देसाई हिच्याशी लग्न केले, पण हे लग्न 3 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले नाही आणि 2012 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

राजकारणामध्ये गेल्यावर त्याने परदेशी महिला ऍना लेजनेवा हिच्यासोबत तिसरे लग्न केले. त्यांची ओळख 2011 मध्ये झाली होती. यानंतर दोघांनी 2013मध्ये लग्न केले आणि त्याच वर्षी ती पवन कल्याणच्या मुलीची आई बनली. त्यांना एक मुलगाही आहे. त्याचे नाव मार्क शंकर पवनोविच असे ठेवले आहे. पवन कल्याणने जाहिरातीमध्ये देखील काम केले आहे. तो साऊथ इंडस्ट्रीचा पहिला असा अभिनेता आहे, ज्याने पेप्सीची पहिली जाहिरात केली होती.

पवनच्या राजकीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झाल, तर तो 2008 पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्याने बरेच दिवस आपला भाऊ चिरंजीवी यांच्या प्रजा राज्य पक्षामध्ये काम केले होते. यानंतर पवनने आपल्या स्वत:चा पक्षाची सुरुवात केली. त्याच्या पक्षाचे नाव जनसेवा पार्टी असे आहे. याची सुरुवात 2014 साली केली होती. तेव्हापासून पवन कल्याण या पक्षात सक्रिय आहे.

पवन कल्याणची संपत्ती
पवन कल्याण याच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर माध्यमांतील वृत्तांनुसार, तो तब्बल 113 कोटी रुपयांच्या संंपत्तीचा मालक आहे. तसेच, तो महिन्याला 1 कोटी रुपयांची कमाई करतो. यामध्ये ब्रँड एंडॉर्समेंट, एव्हेंट्स यांचाही समावेश आहे. एका सिनेमासाठी पवन तब्बल 10 कोटी रुपये मानधन घेतो. त्याच्या ताफ्यामध्ये ऑडी क्यू 7, मर्सिडीज बेंझ जी55 एएमजी आणि मर्सिडीज बेंझ आर क्लास यांसारख्या गाड्याही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यनचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘एका फ्लॉप सिनेमाने माझे करिअर संपेल…’
कपिल शर्मानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची एंट्री, लूक पाहून चाहते फिदा
‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…

हे देखील वाचा