मनोज बाजपेयी हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि त्याच्या रूपापेक्षा अभिनयामुळे जास्त प्रेम मिळाले. कारण चित्रपटसृष्टीत असे काही प्रमाणात असते की काम आणि दिसणं ही या क्षेत्रात महत्वाच असत आणि चित्रपटसृष्टीत असे काही मोजकेच अभिनेते आहेत, ज्यांना त्यांच्या रूपापेक्षा अभिनयामुळे जास्त प्रेम मिळते. कारण त्याचे अभिणयाचा अभ्यास प्रंचड आहे. मात्र, हा टप्पा गाठणे सोपे नव्हते. एक काळ असा होता जेव्हा त्यांना काम मिळत नव्हते आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चांगले चालले नव्हते. पण हळूहळू, मनोज बाजपेयी यांनी स्वतःला सिद्ध केले आणि आज ते मनोरंजन उद्योगातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. तर मनोज बाजपेयी यांचा आज 56 वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याबाबत काही गोष्टी जाणुन घेवुयात.
मनोज (manoj)बाजपेयी याचा 23 एप्रिल 1969 रोजी बिहारमधील बेलवा गावात जन्म झाला. त्याना लहानपणापासुनच अभिनयाची आवड असल्याने त्यांनी लहानपणीच अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी कॅालेज मध्ये असतानाच नाट्यक्षेत्रात प्रवेश घेतला. पण ते त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यांच्या आई-वडिलांना त्यांना डॉक्टर करायचे होते त्यामुळे त्यांनी जबरदस्ती एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायला लावले. मात्र त्यात ते उत्तीर्ण झाले नाही. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणले की मुद्दामून मी चुकीची उत्तरे लिहून नापास झालो होतो.
नंतर त्यांनी अभिनेता होण्यासाठी नॅशनल स्कूल ड्रामा येथे प्रवेश घेण्यासाठी खूप प्रयत्न केला मात्र चार वेळेस ते नाकारले गेले, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र त्या परिस्थितीत मित्राने साथ दिली ते सावरले. नंतर ऑडिशन दरम्यान त्यांना अनेकदा रिजेक्ट केले गेले. ते पाच मित्रांसोबत एका चाळीत राहत असत. काम शोधण्यासाठी दिवस रात्र फिरत असत मात्र कोणतेही भूमिका मिळत नव्हती. आणि शेवटी हार न मानता प्रयत्न करत राहिले. आज ते उत्तम अभिनेते आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अहान शेट्टीच्या आगामी सिनेमाचे नाव असणार सनकी; यासाठी साजिद नाडियाडवालाकडून घेतली मदत










