Thursday, November 21, 2024
Home भोजपूरी लाइव्हमध्ये अचानक भडकला पवन सिंग, ‘असे’ म्हणत दिली धमकी जीवे मारण्याची, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

लाइव्हमध्ये अचानक भडकला पवन सिंग, ‘असे’ म्हणत दिली धमकी जीवे मारण्याची, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भोजपुरी सिनेमाचे चाहते फक्त बिहार उत्तर प्रदेशातच नाहीत, तर जगभरात भोजपुरी गाणी मोठ्या उत्साहाने ऐकली जातात. भोजपुरी अभिनेता पवन सिंग (Pawan Singh)आजकाल आपल्या गाण्यांमुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व गाजवत करत आहे. त्याची अनेक सुपरहिट गाणी एकापाठोपाठ प्रदर्शित झाली आहेत. जी केवळ भोजपुरी इंडस्ट्रीमध्येच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही खूप ऐकली जातात. त्याचबरोबर पवन आपल्या अभिनयानेच लाखो प्रेक्षकांना प्रभावित करत नाही, तर तो आपल्या आवाजानेही लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. पवन हा असा स्टार आहे, जो त्याच्या प्रत्येक अंदाजाने प्रशंसा मिळवतो. मग तो अभिनय असो वा डान्स, संगीत गाणे असो किंवा सहकलाकारांसोबत रोमान्स असो. तो भोजपुरी गाण्यांमधून खूप धमाल करतो. त्याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना, त्याच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

पवन सिंगने होळीच्या निमित्ताने त्याचे गाणेही आणले होते, ज्याचे शीर्षक ‘फलाना बो फरार भइली’ आहे. होळीनंतरही हे गाणे पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. अशा परिस्थितीत होळीनंतर पवन सिंग सोशल मीडियावर लाइव्ह आला. हे गाणे हिट झाल्याबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानले. मात्र, यादरम्यान अचानक पवन सिंगला राग आला आणि त्याने कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिली. अभिनेत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खर तर, होळीनंतर पवन सिंग आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्रामवर लाइव्ह आला होता. यादरम्यान, त्याने पहिल्या क्रमांकावर गाणे ट्रेंड केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. लाइव्हमध्ये अभिनेता म्हणाला की, “इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे, जेव्हा होळीनंतर एखादे गाणे पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. माझ्या भावा तुम्हा सर्वांपुढे नतमस्तक आहे.” असे सांगितल्यानंतर पवन सिंग अचानक भडकला आणि लाइव्ह व्हिडिओमध्येच त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये पुढे, पवन सिंग भोजपुरी भाषेत बोलतो की, “आ जिन जाना कही जाला, बाड़े एक जाना न्यूज बनावत आरे… मैं नहीं बोलता हूं। आ ज्यादे सनक गईनी ता फिर सोच लिहा आपन हाल। ये है वो है दिस है दैट है… बहुत मार मारेब। पवन सिंह नाम है हमार। कोई ये नहीं है, जिसका फैन हो उसका बड़ाई करो। उसको यहां पर रखो, लेकिन किसी और की शिकायत मत किया करो। ना ता बहुत मार मारब। गुड़गांव में रहेला बेटा जी.” लाईव्ह येऊन पवन सिंग कोणाला मारण्याची धमकी देत ​​आहे, ही गोष्ट समोर आलेली नाही. याशिवाय पवन सिंगने त्याच्या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मात्र, दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये पवन सिंग त्याच्या ‘फलाना बो फरार भइली’ या गाण्याच्या व्ह्यूजला खोटे म्हणणाऱ्यांना फटकारत आहेत. सोशल मीडियावर काही लोकांचे म्हणणे आहे की, पवन सिंगला पेड ट्रेंडिंग मिळते आणि त्याच्या गाण्यांचे व्ह्यूजही बनावट आहेत. या लोकांवर नाराज झाल्याने पवन सिंगने लाइव्ह व्हिडिओमध्ये आपला संताप व्यक्त केला असल्याचे बोलले जात आहे.

पवन सिंगचे ‘फलाना बो फरार भइली’ हे गाणे प्रदर्शित होऊन जवळपास १० दिवस झाले आहेत. हे गाणे पवन सिंगच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यामध्ये पवन सिंगसोबत अभिनेत्री स्मृती सिन्हा दिसत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हे गाणे अनेक दिवसांपासून युट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा