×

पवन सिंग आणि स्मृती सिन्हा यांची जबरदस्त केमिस्ट्री दाखवणारे ‘व्हाईट व्हाईट लहेंगा’ होळी सॉन्ग झाले प्रदर्शित

भोजपुरी भाषेत प्रत्येक सणासाठी प्रत्येक खास दिवसासाठी गाणी बनतात, आणि त्या विशिष्ट दिवशी किंवा दिवसाआधी ती गाणी प्रदर्शित केली जातात. विशेष म्हणजे या काही खास दिवसांसाठी एकापेक्षा अधिक अग्नी तयार होऊन देखील सर्वच गाणी हिट ठरतात. लवकरच होळीचा सण येत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर भोजपुरी भाषेत एक नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह (Pawan singh) आणि स्मृति सिन्हा (Smriti Sinha) यांच्या या नवीन गाण्याने प्रदर्शित झाल्या झाल्या तुफान बज निर्माण केला आहे. या होळीच्या गाण्याने आठवडाभराआधीच होळीचे वातावरण निर्माण केले आहे. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या गाण्यांची वाट तर सर्वच प्रेक्षक आतुरतेने बघत असतात. फक्त भोजपुरीच नाही तर इतर भाषांमध्ये देखील त्याचे असंख्य फॅन्स आहेत.

व्हाईट-व्हाईट लहेंगा या होळीच्या गाण्याने यूटुबवर प्रदर्शित होताच इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. या गाण्याला प्रत्येक तासासोबतच अनेक व्ह्यूज मिळत आहे. यासोबतच गाण्याला अनेक कमेंट्स देखील भरपूर मिळत आहे. पवन सिंग आणि स्मृती सिन्हा यांची जबरदस्त केमिस्ट्री देखील लोकांना आवडत असून, त्यांच्या जोडीने अमाप लोकप्रियता मिळवली आहे. हे होळी स्पेशल गाणे शुभ लाभ यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले असून, काही मिनिटेच या गाण्याने जुने सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहे. या दोघांना एकत्र पाहताना मिळत असल्याने त्यांचे फॅन्स देखील उत्साहित झाले आहे.

या गाण्यात दिसणारे स्मृती सिन्हाचे लटके झटके पाहून भोजपुरी प्रेक्षक चांगलेच सुखावले आहेत. बऱ्याच काळानंतर या गाण्याच्या माध्यमातून स्मृतीचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. तर पवन सिंगची स्टाईल देखील पाहण्याजोगी आहे. दरवर्षी पवनसिंग होळीच्या पार्श्वभूमीवर नवीन गाणे घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतो. हे गाणे पवनसिंग आणि प्रियांका सिंग यांनी गायले असून गणायचे बोल अजय बच्चन यांनी लिहिले आहे. यावर्षीचा होळीचा आनंद अधिक वाढवण्यासाठी पवन सिंग आणि स्मृती सिन्हाचे व्हाईट व्हाईट लहेंगा हे गाणे तुम्ही नक्कीच तुमच्या प्लेलिस्टमध्ये ऍड करू शकतात.

Latest Post