अनेकदा कलाकारांसोबत शूटिंग दरम्यान वेगवेगळे अपघात होतात आणि त्यात कलाकार जखमी होतात. काही अपघात तर कलाकारांच्या जीवावर बेतणारे देखील ठरतात. सेटवर कलाकारांसोबत होणाऱ्या अपघातांबद्दल नेहमीच आपण ऐकत आणि पाहत असतो. असाच एक अपघात बाहुबली फेम प्रभाससोबत झाला आणि आता त्याच्यावर सर्जरी केली जाणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या राधेश्याम (Radhe Shyam) सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बाहुबली सिनेमानंतर प्रभासला संपूर्ण देशात आणि जगभरात मोठी ओळख मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांना प्रभासच्या आगामी राधेश्याम सिनेमाची खूपच उत्सुकता होती. या सिनेमातील प्रभासच्या भूमिकेचे आणि अभिनयाचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होताना दिसत आहे. मात्र एकीकडे त्याचे फॅन्स त्याचे कौतुक करत असताना दुसरीकडे मात्र त्यांना प्रभासच्या तब्येतीची चांगलीच चिंता लागली आहे.
#Prabhas had 2 surgeries for #Baahubali (2 Parts) , out of 2 one is shoulder.#Salaar & #Radheshyam Knee Surgery.
All are during action episodes
BIGGEST LOTTERY for him.On the other hand #AlluArjun too had almost 8 to 10 surgeries in his entire career.
MOST HARDWORKING hero. pic.twitter.com/7hPO7njbD5— RadheShyam ???? (@Preeth_Prabhas) March 18, 2022
प्रभास नुकताच स्पेनसाठी रवाना झाला आहे. तिथे त्याच्यावर सर्जरी करण्यात येणार आहे. प्रभासला काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी गंभीर जखम झाली होती आता या जखमेवर स्पेनमध्ये सर्जरी होणार आहे. एका वेबसाईटनुसार प्रभासला ही जखम ‘बाहुबली’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. मधल्या काही काळात प्रभास त्याच्या आगामी ‘सालार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. यादरम्यान पुन्हा तो जखमी झाला. मात्र त्याने त्याची जखम दुर्लक्षित केली आणि आता त्याचा त्याला जास्त त्रास होत आहे. रस्ताही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो स्पेनमधील बार्सिलोना येथे साजरी करणार आहे. या सर्जरीनंतर डॉक्टरांनी प्रभासला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याच्या या सर्जरीच्या बातमीमुळे त्याचे फॅन्स चिंतेत असून सोशल मीडियावर त्याच्या लवकर रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहे.
नुकताच प्रभास आणि पूजा हेगडे यांचा राधे श्याम सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने तुफान बज निर्माण केला होता. कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन देखील लांबले. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाला समीक्षकांनी मिळत्याजुळत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मॉडेल असे बोलले जात होते, मात्र प्रदर्शनानंतर सर्वच विधानं फोल ठरली. या सिनेमाने १७५ कोटींचा व्यवसाय केला. प्रभास लवकरच ‘सालार’ सिनेमात दिसणार असून, हा चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे. यात तो दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसेल. यासोबतच तो ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’मध्ये देखील झळकेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –