Video | वयाच्या ८६ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी चालवली डोंगर दऱ्यांतून कार

बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र हे एक उत्साही व्यक्तिमत्व आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमधूनही हे आपल्याला समजतच असते. सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशातच त्यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या कारसोबत दिसत आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “हा माझा सर्वात गोड, माझा पहिला FAIT आहे. मी ते १९६० मध्ये विकत घेतले. आज मी टेकडीच्या कच्च्या रस्त्यावरून गाडी चालवली. होळीच्या शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो.” त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टला त्यांच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या संख्येने या पोस्टला लाईक्स येत आहेत.

नुकतेच त्यांनी त्याच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांना या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहायला मिळाले. ‘दो चोर’ चित्रपटातील हे सुपरहिट गाणे, ‘चाहे रहो दूर’, ‘चाहे रहो पास… सुन लो मगर एक बात’ हे दोन्ही कलाकार आज म्हातारे झाले आहेत.

धर्मेन्द्रा आणि तनुजा दोघांनाही बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आहेत. जुने मित्र भेटले तेव्हा दोघांनाही जुने दिवस आठवले. दोन्ही वयोवृद्ध स्टार्स एकमेकांना खूप प्रेमाने भेटले. या भेटीची क्लिपिंग धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आठवणींच्या खिडकीतून भूतकाळात डोकावताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी तनुजा यांची बहिण कै. नूतन जी आणि त्यांच्या आई कै. शोभना समर्थ यांचीही आठवण झाली.

धर्मेंद्र यांनी पोस्टसोबत एक उत्तम कॅप्शन देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये ते लिहिले आहे की, “शोभना जी, नूतन आणि तनुजा यांचे जुने कौटुंबिक नाते आहे. ते एकमेकांच्या घरी नियमित येत असतात. नुकतीच प्रेमळ, गोड आणि चटकदार तनुजाशी एक प्रेमळ भेट झाली.” धर्मेंद्र पुढे सांगतात की, “काही लोक आमच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करतात, तनुजाही त्यांना सपोर्ट करते आणि दोघी म्हणतात की त्यांना नरकात जाऊ द्या.” त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना हा फोटो खूप आवडला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

Latest Post