Friday, July 5, 2024

प्रसाद खांडेकरचा 100 वा प्रयोग पडला पार, पोस्ट शेअर करत वेधले चाहत्यांचे लक्ष

मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘ फेम प्रिसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकर याने विनोदबुद्धी आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरुन हसण्याला भाग पाडले आहे. या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाममुळेच प्रसाद घराघरात पोहोचला. आता अभिनेता लवकरच मोठ्या पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ (Maharashrachi Hasya Jatra) याचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्त माळी (Prajakta Mali) करत आहे. मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) हे या कार्यक्रमाचे परिक्षण करत आहेत. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा प्रसाद रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच प्रसादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जी, तुफान व्हायरल झाली आहे.

आमच्या कुर्रर्रर्रर्र ह्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत 31 डिसेंबर ला मोठ्या दिमाखात पार पडला …स्वतःच्या नाटकाची ट्रॉफी सगळ्या टीम च्या हातात बघून भारी वाटत होतं …. कोरोना काळात मोठ्या धाडसाने सुरू झालेल्या आमच्या ह्या नाटकाने हाऊसफुल चे बोर्ड घेत पुरस्कार मिळवत मिळवत वर्षभरातच शंभरी गाठली ह्या धाडसाबद्दल निर्माती विशाखा ताई , उमेश दादा , पूनम ताई आणि महेश दादा ह्याचं खरंच कौतुक .निर्मात्याच कौतुक अजून एका गोष्टीसाठी प्रायोगांच्या तालमी पासून ते आता शतकमहोत्सवी प्रयोग होईपर्यंत कुठे ही काही ही कमी पडू दिले नाही ….आम्हा कलाकारांचे लाड करत करत हे प्रयोग पार पडले ….. आम्हा कलाकारांच्या सगळया तारखा सांभाळत चांगल्या तारखा करत 100 प्रयोगांचा टप्पा गाठणं ह्यासाठी गोट्या काकांचे सुद्धा आभार ….. संपूर्ण टेक्निकल पडद्याआड काम करणारी बॅकस्टेज ची टीम .माझी सहाय्यक दिगदर्शक ….माझे टेक्निकल हेड……….सुनील आणि हेरंब ही मॅनेजमेंट ची टीम सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ….माझे सहकलाकार पॅडी दा विशाखा ताई आणि नमा …तुम्हा तिघांशिवाय ह्या नाटकाला न्याय मिळणं कठीण होत …थँक्स आणि सरते शेवटी सर्वात महत्वाचे मायबाय रसिक प्रेक्षक …तुमचे आभाळाएव्हढे आभार कारण आम्ही कलाकारांनी किती ही जीव तोडून काम केलं आणि कलाकृती उभी केली तरी ती कलाकृती डोक्यावर घ्यायची की ती जमिनीवर आपटायची हे सर्वस्वी तुमच्या हातात असत आणि माझ्या ह्या कलाकृती वर भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खुप प्रेम …. कुर्रर्रर्रर्र अजून शेकडो प्रायोगांचा टप्पा पार करेल ह्यात शंका च नाही

 

View this post on Instagram

 

अभिनेता प्रसाद खांडेकर याने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन कुर्रर्रर्रर्र नाटकाच्या शतक महोत्सवी प्रयोगादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. त्याशिवाय अभिनेत्याने फोटो शेअर करत हटके कॅप्शन दिलं आहे ज्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. प्रसाद अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. त्याने नाटकापूर्वी रंगभूमीवरील काही फोटो शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सावरतेय, वाढतेय आणि चमकतेय’, मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वच्या 43 व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, थाटामाटात पार पडला लग्नसोहळा

हे देखील वाचा