Monday, May 27, 2024

‘माझा काही भरोसा नाही’, प्राजक्ता माळीने चाहत्याच्या कमेंटवर दिले हटके उत्तर

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अनेक चित्रपटामध्ये काम केले असून तिची नुकतंच प्रदर्शित झालेली वेबसिरीज ‘रान बाजार‘ यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत असते. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, सतत आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने नुकतंच ट्रेडिशनल लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे प्राजक्ता खुपच चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहोचणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माली (Prajakta Mali) हिने नुकतंच मराठमोळ्या अंदाजात फोटोशुट केले आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटलरुन काही फोटो शेअर केले होते. प्रेक्षकांनी तिच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला. त्यापैकी एका चाहत्याने हटके कमेंट केली होती, तेव्हा प्राजक्तानेही कमेंटचे लक्ष वेधनारे उत्तर दिले आहे.

हिरव्या रंगाचा काष्टा, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर, अशा मराठमोळ्या लुकमध्ये प्राजक्ताने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं. साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे. दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत. तेव्हा कुठे जाऊन लूक साधला गेला आणि आत्मा सुखावला.” या पोटोवर एका चाहत्याने कमेंट केली होती की, ‘मी लग्न करु की नाही’, त्यावर प्राजक्ताने हटके उत्तर देत लिहिले की, “करुन टाक माझा काही भरोसा नाही.”

 

View this post on Instagram

 

प्राजक्ताच्या या भन्नाट कमेंटने अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटो तुफान व्हायरल होत असतात. अभिनेत्री रानबाजार वेबसिरिजमध्ये तिने ‘रत्ना’ नावाची भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्रीचे अनेक कलाकारंनी कौतुक केले होते. मराठी टीव्हीवरील प्रसारित ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमामधून अभिनेत्री रोज आपल्या प्रेक्षकाचे मनोरंजन करत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! अमेरिकेतील कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा आवाजच गेला, उपचारासाठी धावले डॉक्टर
‘गैंग्स ऑफ वासेपुर’ फेम डेफनिटवर आरोप, रांची पोलिस्टेशनमध्ये गुन्हा दाखल

हे देखील वाचा