Monday, July 1, 2024

‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचे यशस्वी शंभर प्रयोग संपन्न, प्रसाद खांडेकरांची भावनिक पोस्ट व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि ओळख मिळवून दिली. आपल्यात असलेले कलागुण दाखवण्याची संधी दिली. याच कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणावर नावारूपास आलेला एक चेहरा म्हणजे लेखक, अभिनेता प्रसाद खांडेकर. एक विनोदी अभिनेता म्हणून प्रसादने स्वतःची एक वेगळी ओळख तर निर्माण केलीच सोबतच एक उत्तम लेखक म्हणूनही नावारूपास आला. सध्या प्रसाद ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकारून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकात तो पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आदी कलाकारांसोबत दिसतो. नुकताच या नाटकाचा 100 वा प्रयोग संपन्न झाला. याचे औचित्य साधत प्रसादने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक आभारपर पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

प्रसादने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमच्या कुर्रर्रर्रर्र ह्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत 31 डिसेंबर ला मोठ्या दिमाखात पार पडला … स्वतःच्या नाटकाची ट्रॉफी सगळ्या टीम च्या हातात बघून भारी वाटत होतं …. कोरोना काळात मोठ्या धाडसाने सुरू झालेल्या आमच्या ह्या नाटकाने हाऊसफुल चे बोर्ड घेत पुरस्कार मिळवत मिळवत वर्षभरातच शंभरी गाठली ह्या धाडसाबद्दल निर्माती विशाखा ताई , उमेश दादा , पूनम ताई आणि महेश दादा ह्याचं खरंच कौतुक .निर्मात्याच कौतुक अजून एका गोष्टीसाठी प्रायोगांच्या तालमी पासून ते आता शतकमहोत्सवी प्रयोग होईपर्यंत कुठे ही काही ही कमी पडू दिले नाही ….आम्हा कलाकारांचे लाड करत करत हे प्रयोग पार पडले ….. आम्हा कलाकारांच्या सगळया तारखा सांभाळत चांगल्या तारखा करत 100 प्रयोगांचा टप्पा गाठणं ह्यासाठी गोट्या काकांचे सुद्धा आभार ….. संपूर्ण टेक्निकल पडद्याआड काम करणारी बॅकस्टेज ची टीम .माझी सहाय्यक दिगदर्शक ….माझे टेक्निकल हेड……….सुनील आणि हेरंब ही मॅनेजमेंट ची टीम सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ….माझे सहकलाकार पॅडी दा विशाखा ताई आणि नमा …तुम्हा तिघांशिवाय ह्या नाटकाला न्याय मिळणं कठीण होत …थँक्स आणि सरते शेवटी सर्वात महत्वाचे मायबाय रसिक प्रेक्षक …तुमचे आभाळाएव्हढे आभार कारण आम्ही कलाकारांनी किती ही जीव तोडून काम केलं आणि कलाकृती उभी केली तरी ती कलाकृती डोक्यावर घ्यायची की ती जमिनीवर आपटायची हे सर्वस्वी तुमच्या हातात असत आणि माझ्या ह्या कलाकृती वर भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खुप प्रेम …. कुर्रर्रर्रर्र अजून शेकडो प्रायोगांचा टप्पा पार करेल ह्यात शंका च नाही.”

प्रसादने त्याच्या या पोस्टमधून कलाकार आणि प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहे. कॉमेडीच्या टायमिंगमुळे प्रसाद ओळखला जातो. त्याने लिहिलेले स्किट आणि अभिनय केलेले स्किट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. प्रसाद मराठीसोबतच गुजराती इंडस्ट्रीमध्ये देखील कार्यरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला होता, ‘दीपिका माझ्यासाठी दाल चावलसारखी होती…’
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार

हे देखील वाचा