प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी महात्मा गांधींवर लिहिलेल्या दोन पुस्तकांचे हक्क अॅप्लॉज एंटरटेनमेंटने (Applause Entertainment) घेतले आहेत. नुकतेच अॅप्लॉज एंटरटेनमेंटने महात्मा गांधी यांच्या जीवनावरील बायोपिकची घोषणा केली आहे. महात्मा गांधींच्या जीवनावर बनवण्यात येणारी ही सिरीज रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या ‘गांधी बिफोर इंडिया’ आणि ‘गांधी – द इअर्स दॅट चेंज द वर्ल्ड’ या पुस्तकांवर आधारित असेल. ही सिरीज जगभरातील प्रेक्षकांसाठी बनवली जाणार असून, तिचे चित्रीकरण भारतात तसेच परदेशातही होणार आहे.
प्रतीक गांधी साकारणार महत्त्वाची भुमिका
अॅप्लॉज एंटरटेनमेंटने महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी प्रतीक गांधीची (Pratik Gandhi) निवड केली आहे. या सिरीजमध्ये महात्मा गांधींचा जीवनपट तपशीलवार दाखवण्यात येणार आहे. गांधीजींच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कामांपर्यंत आणि भारतात ब्रिटिशांशी लढा देण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी या सिरीजमध्ये कथा म्हणून दाखवल्या जाणार आहेत. (actor pratik gandhi to play mahatma gandhi in series)
अप्लॉज एंटरटेनमेंटचे सीईओ समीर नायर म्हणाले…
अप्लॉज एंटरटेनमेंटचे सीईओ समीर नायर यांनी महात्मा गांधींवरील या सिरीजबद्दल बोलताना सांगितले की, “रामचंद्र गुहा हे एक महान इतिहासकार आणि कथाकार आहेत. ‘गांधी – बिफोर इंडिया’ आणि ‘गांधी – द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ ही त्यांची क्लासिक पुस्तके दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. गांधीजींच्या व्यक्तिरेखेसाठी प्रतीक गांधींपेक्षा श्रेष्ठ कोणाचाही विचार आम्ही करू शकत नाही.”
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल प्रतीक गांधी म्हणाला…
महात्मा गांधींच्या चरित्राबद्दल बोलताना प्रतीक गांधी म्हणाला, “माझा गांधीवादी तत्त्वज्ञान आणि त्यांच्या मूल्यांवर विश्वास आहे. त्यांचे अनेक गुण मी माझ्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय थिएटरच्या काळातही मी महात्मा गांधींची भूमिका केली होती. ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत आणि आता पुन्हा पडद्यावर या महान नेत्याची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मला विश्वास आहे की, ही भूमिका स्वीकारणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी समीर नायर आणि त्याच्या टीमसोबत हा प्रवास सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.”
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहतेही खूप आनंदी आहेत. आता या चित्रपटाबद्दल पुढची अपडेट काय असेल, हे पाहणे रंजक ठरेल!
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा