Friday, April 19, 2024

‘हर्षद मेहता’ फेम प्रतिक गांधीने मुंबई पोलिसांवर केले धक्कादायक आरोप, ट्विटरवरील कटु अनुभवाची पोस्ट होतेय व्हायरल

‘स्कॅम १९९२’ सिरीजमध्ये हर्षल मेहताची भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेने अभिनेता प्रतिक गांधीला (Pratik Gandhi) प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सिरीजमधील त्याचा दमदार अभिनय आणि गाजलेले डायलॉग यामुळे प्रतिकला रातोरात स्टार केले. मात्र सध्या प्रतिक त्याच्या एका व्हायरल ट्विटमुळे चांगलाच चर्चेत आळा आहे ज्यामध्ये त्याने मुंबई पोलिसांनी त्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा अनुभव शेअर केला आहे. काय आहे हे चर्चित प्रकरण चला जाणून घेऊ. 

प्रतीक गांधीने रविवारी मुंबई पोलिसांसोबतचे त्यांचे वाईट अनुभव ट्विटरवर शेअर केले. प्रतिक गांधी यांनी सांगितले की, महामार्गावर व्हीआयपी मुव्हमेंट सुरू असल्याने मुंबई पोलिसांनी गैरवर्तन करून त्याचा अपमान केला. याबद्दलचे प्रतिकचे ट्विट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने “व्हीआयपी मुव्हमेंटमुळे मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम झाला होता. शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी पायी चालायला लागलो. यावर पोलिसांनी मला ओढून एका गोदामात थांबवले. त्यांनी मला काहीही सांगितले नाही आणि माझा अपमानही केला,” असा कटु अनुभव सांगितला आहे यावर चाहत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात आहेत, त्यामुळे असे घडले असावे, असा अंदाज लावला आहे.

प्रतिक गांधीच्या या ट्विटवर तिथल्या अनेक युजर्सनीही त्याची खिल्ली ही उडवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी “प्रत्येकवेळी रिस्क है तो इश्क है” असे नसते म्हणत मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावर प्रतीक गांधी यांनी त्याला उत्तर देत “भाऊ कोणतीही रिस्क घेत नाही, फक्त आपल्या कामावर जात होतो,” असे उत्तर दिले आहे. दरम्यान अभिनेता प्रतिक गांधीचे अनेक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘वो लड़की है कहाँ’ या चित्रपटाचा समावेश आहे ज्यामध्ये त्याच्यासोबत तापसी पन्नू दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे नेटफ्लिक्सचा एक प्रोजेक्टही आहे. ‘फुले’ चित्रपटात प्रतीक गांधी महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

हे देखील वाचा