बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस आजकाल तिच्या अनेक हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. पण इतकी व्यस्त असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहण्यास विसरत नाही. ती अनेकदा तिचा पती निकसोबतचे फोटो शेअर करते. आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली आहे. अभिनेत्री तिच्या प्रेमाबद्दल आणि पती निकसोबतच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.
माध्यमांनी प्रियांकाला एका संभाषणादरम्यान विचारले की, तीने आयुष्यातील तिच्या प्रेमातून काय शिकली? यावर प्रियांका म्हणाली की, “मला वाटते की, प्रेम ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा एक एंड गेम आहे आणि याचा अर्थ केवळ आपल्या जोडीदारावर प्रेम करणे नाही, तर याचा अर्थ आपल्या आई- वडिलांवर आणि कुटुंबावर प्रेम करणे देखील आहे. मला खरोखर विश्वास आहे की, प्रेम जग सुंदर बनवते. प्रेम करण्याची एकच पद्धत आहे. ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे.”
प्रियांका म्हणते की, “निक त्याचे आयुष्य आणि माझे यश किंवा करियर कसे संतुलित करतो, हे पाहून मला आश्चर्य वाटते. मला कुठे जायचे आहे आणि मला काय आवडते हे त्याला चांगलेच माहित आहे. हे सगळं त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ही अशी गोष्ट आहे, ज्याची मला जाणीवही नव्हती की, हे मला पाहिजे आहे. म्हणजेच एका चीयरलीडरची.”
प्रियांका पुढे म्हणते, “मी वयाच्या १७ व्या वर्षी कामाला सुरुवात केली. तेव्हापासून ते माझ्याबरोबर पाठीशी उभे आहे. मला माझ्या लक्षात आले नाही की, मी माझ्या कारकिर्दीत किती मेहनत घेतली. याचे मूल्य समजून घेण्यासाठी मला माझ्या जोडीदाराची गरज आहे. जो जोडीदार याचे कौतुक करतो ते मिळणे खरोखर आश्चर्यकारक आहे.”
या व्यतिरिक्त, जेव्हा प्रियांकाला विचारण्यात आले की, निकसोबतच्या लग्नामुळे तिच्या कामावर कसा परिणाम झाला? यावर अभिनेत्री म्हणाली, “निकने मला खूप प्रभावित केले आहे. आता मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात अधिक शांत झाली आहे. पूर्वी कोणी मला काही सांगायचे किंवा मला राग आला, तर मी त्याला चोख प्रत्युत्तर द्यायचे. आता जर मी कंटाळले, तर मी शांत होते. माझा पती आणखी शांत आहे आणि कोणत्याही समस्येवर उपाय शोधू शकतो. तो डिप्लोमेट आहे, तर मी पूर्णपणे मिर्ची आहे.
प्रियांका चोप्रा लवकरच ‘सिटाडेल’ चित्रपटात दिसणार आहे. यासोबत ती टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल ७’ मध्येही दिसणार आहे. हॉलिवूडनंतर अभिनेत्री बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत तिच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात दिसणार आहे. मात्र, प्रियंका आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्याचे दिसते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा
-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा